कल्याण : उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुले जर घराबाहेर जात असतील तर पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कल्याणमध्ये अशाच एका दुर्दैवी घटनेत एका 16 वर्षीय मुलाचा पोहण्याचा आनंद जीवावर बेतला आहे. हा मुलगा आपल्याच सोसायटीत असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. त्याला स्विमिंग पुलातील पाण्याचा अंदाज आला नाही आणि पोहणे (Swimming) न जमल्याने त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या घटनेचे वृत्त कल्याण शहरात पसरताच संपूर्ण परिसरात मुलाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. आयुष अमित घोष (16) असे स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (16-year-old boy drowns in swimming pool in Kalyan)
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. माधव संकल्प कॉम्प्लेक्स असे या सोसायटीचे नाव आहे. या सोसायटीतील क्लब हाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये 16 वर्षांचा आयुष पोहण्यास गेला होता. रविवारच्या सुट्टीमुळे तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यात गुदमरून तो पाण्यात बुडाला. त्याला दुसरे कोणी वाचवायला जाण्याआधीच त्याला मृत्यूने गाठले होते. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
माधव संकल्प सोसायटीत लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी असे दोन स्वतंत्र स्विमिंग पूल आहेत. यातील मोठ्यांसाठी असलेल्या पूलमध्ये आयुष पोहायला गेला होता. आयुष हा स्विमींग पूलमध्ये एकटाच पोहत होता. त्यामुळे त्याला लगेच कोणी पाहिले नाही. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. आयुष हा बारावीत शिकत होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, तर त्याला एक बहीण आहे. त्याचे वडील कामा निमित्त पुण्याला गेले होते. त्याचदरम्यान पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी तो स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरला होता. यावेळी त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि आयुषचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सध्या या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. (16-year-old boy drowns in swimming pool in Kalyan)
इतर बातम्या
Bhayander Shivsena Dispute: मीरा भाईंदरमध्ये शिवसेना शहर प्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण