आनंद परांजपे यांच्या विरोधात गुन्हे दाखल, मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात वापरले होते अपशब्द, आनंद परांजपे यांना अटक होणार?

| Updated on: Dec 24, 2022 | 11:17 PM

आपल्या राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे होऊ लागली की काय? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

आनंद परांजपे यांच्या विरोधात गुन्हे दाखल, मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात वापरले होते अपशब्द, आनंद परांजपे यांना अटक होणार?
आनंद परांजपे
Follow us on

ठाणे : राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय दंड विधान 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या एनसी आता एफआयआरमध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. कागनिझिबल अफेन्समध्ये घेतल्या आहेत. १० पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती आहे.

आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार येणार असल्याची माहिती आहे. आपल्या राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे होऊ लागली की काय? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. अटक कराच, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

आनंद परांजपे यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी ठाण्यातील काही पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झालेत. त्यामुळं माजी खासदार आनंद परांजपे यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणाराय, असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं. ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गु्न्हे दाखल केले ते खरे गुन्हेगार आहेत, असंही त्यांनी म्हंटलं. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. कोणाची बदनामी त्यातून केली नाही, असंही ते म्हणाले.