ठाणे, ४ सप्टेंबर २०२३ : राजू चव्हाण हे डोंबवलीत राहतात. डोंबिवलीतील टाटा पावर लेनमध्ये साई गॅरेज आहे. तिथं गाड्यांचे पार्ट विक्री केली जाते. दुकानदाराने या रस्त्यावर दुकान थाटले. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. सामान्य व्यक्तीला चालायला रस्ता उरत नव्हता. रस्त्यावर अपघात होत होते. हा रस्ता सामान्य व्यक्तींसाठी मोकळा होणे गरजेचे होते. राजू चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. डोंबिवली मनपा, वाहतूक विभाग, पोलीस प्रशासनाला पत्र दिले. वाहतूक कोंडी करणाऱ्या गॅरेजसह इतर दोन दुकानदारांवर कारवाईची मागणी केली. या तक्रारीची दखल कल्याण, डोंबिवली मनपाने घेतली. त्यामुळे गॅरेजचा मालक संतापला. त्याने राजू चव्हाण या तक्रारकर्त्यास सुरुवातीला धमकी दिली.
त्यानंतर राजू चव्हाण हे तक्रारदार कार्यालयात जात होते. गॅरेजचा मालक राजू यांच्याकडे गेला. पाच-सहा कामगार राजूवर तुटून पडले. भर रस्त्यात राजू यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीसाठी लोखंडी रॉड आणि लोखंडी साहित्याचा वापर करण्यात आला. राजू यांनी कसा बसा आपला जीव वाचवत पळ काढला.
जखमी अवस्थेत राजू स्थानिक पोलीस ठाण्यात पोहचसले. पोलिसांना साही गॅरेजचे मालक आणि स्पेअर पार्टचे मालक सुनील आणि लाला यांची तक्रार केली. इतर पाच ते सहा जणाविरोधात तक्रार दिली. सध्या राजू यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास डोंबिवली रामनगर पोलीस करत आहेत.
सध्या राजू या मारहाणीत गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलीस आता कशाप्रकारे हे प्रकरण हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टाटा पॉवर लेंथचे रस्त्यावर गॅरेज आहे. याची तक्रार राजू चव्हाण यांनी दिली. या तक्रारीवरून गॅरेजविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईकेली. या रागावरून राजू चव्हाण यांना मारहाण करण्यात आली. पाच-सहा कामगारांनी राजू यांनी मारहाण केली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही कुणाची तक्रार करत असाल तर सावध राहा. कारण कोण केव्हा कसा घात करेल काही सांगता येत नाही.