रस्त्यासाठी असं काही काम केलं की, रिक्षा चालकाचं होतंय सर्वत्र कौतुक

| Updated on: May 29, 2023 | 5:41 PM

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एका रिक्षाचालकाने पुढाकार घेतला. गेल्या आठ वर्षांपासून हा रिक्षाचालक हे काम करतोय. सध्या रस्त्यावरील खड्डे बुजवतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

रस्त्यासाठी असं काही काम केलं की, रिक्षा चालकाचं होतंय सर्वत्र कौतुक
Follow us on

प्रतिनिधी, ठाणे : देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात रस्त्याचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. मोठंमोठं रस्ते तयार होत आहेत. स्पायडरमॅन अशी उपाधीही नितीन गडकरी यांना दिली जाते. पण, अजूनही काही रस्ते हे अतिशय खराब आहेत. खराब रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे हे खड्डेवाले रस्ते बुजवणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो.

खड्डे बुजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एका रिक्षाचालकाने पुढाकार घेतला. गेल्या आठ वर्षांपासून हा रिक्षाचालक हे काम करतोय. सध्या रस्त्यावरील खड्डे बुजवतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे तो चर्चेत आला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठंमोठं खड्डे आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजवण्याचं काम हा रिक्षाचालक करतो. महापालिकेला केव्हा जाग येणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

हे सुद्धा वाचा

डांबर मिश्रित खडी मागून घेतो

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते खड्डे बुजविण्यासाठी रिक्षाचालकाने पुढाकार घेतलाय. बेतुरकरपाडा येथे राहणारा हा रिक्षा चालक जिथे रस्त्याचे काम सुरू असेल त्या ठिकाणाहून डांबर मिश्रित खडी मागून घेतो.

खडी टाकून बुजवतो रस्ते

जिथे खड्डे असतील त्याठिकाणी ही खडी टाकून खड्डे बुजवतो. गेल्या आठ वर्षापासून या अवलिया रिक्षा चालकाचा दिनक्रम अविरतपणे सुरू आहे. राजमनी यादव असे या रिक्षा चालकाचे नाव आहे.

आतातरी मनपा पुढाकार घेणार का?

सहजानंद चौक येथील खड्डा बुजवतानाचा व्हिडियो सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. निदान आता तरी महापालिका खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी पुढाकार घेणार का असा सवाल उपस्थित होतोय.