उल्हासनगर : धोकादायक (Dangerous) इमारतीच्या दुरुस्तीसाठी बांधलेली परांची कोसळल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा (Injury) किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र ही परांची रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळल्याने गाड्यां (Vehicles)चं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये इमारत दुरुस्तीचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही परांची हटवायला सुरुवात केली. तसेच उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सपना गार्डन परिसरात शहेनशाह नावाची इमारत आहे. ही इमारत धोकादायक असल्याने पावसाळ्यापूर्वीच इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावून इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी परांची बांधण्यात आली होती. मात्र अनेक दिवसांपासून ही परांची तशीच असल्याने तिच्या दोऱ्या कमकुवत होऊन आज दुपारच्या सुमारास अचानक ही परांची रस्त्यावर कोसळली. सुदैवाने या वेळी रस्त्यावर कुणीही पादचारी नसल्याने कुणालाही इजा झालेली नाही. मात्र ही परांची रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर कोसळल्याने या गाड्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. (Accident while repairing a dangerous building in Ulhasnagar, damage to several vehicles)