कल्याण : कल्याण आणि डोंबिवली खाडी परिसरात अवैध रेती (Sand) उपसा करणाऱ्यांच्या विरोधात कल्याण तहसिल कार्यालयाने धडक कारवाई (Action) केली आहे. रेती उपसा करणाऱ्यांचा कारवाई पथकाने बोटीने पाठलाग करीत कारवाई केली आहे. हा पाठलागाचा थरार पाहून रेती उपसा करणाऱ्यांनी कारवाईस सुरुवातीला प्रतिकार केला. मात्र कारवाई पथक जुमानत नसल्याचे पाहून रेती उपसा करणाऱ्या कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या टाकून पळ काढला. रेती उपश्याचे साहित्य जप्त करण्यात आले. डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसरात ही कारवाई करण्यात आली. (Action taken against illegal sand dredger in Kalyan Dombivali Bay)
कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर आणि डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली. थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला.
तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणाऱ्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या घेत पळ काढला. कारवाई पथकाने सात रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे. (Action taken against illegal sand dredger in Kalyan Dombivali Bay)
इतर बातम्या
पालघरमधील हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या
Nagpur Crime : भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या