ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे उत्परिवर्तित रुप डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात यश मिळविल्यानंतर या नव्या संकटाने ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची चिंता वाढवली आहे. (after Nashik Four Corona delta plus patients found in Thane health department on alert)
ठाणे महापालिका क्षेत्रात 3 तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढल्याने चिंता वाढली आहे. 25 वर्षाखालील 2 जण तर 56 वर्षाखालील 2 जण कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित झाले आहेत. या मध्ये 2 महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. या रुग्णांवर उपचार करून पाठवण्यात आले आहे. असे असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि सापडलेले डेल्टा प्लसचे बाधित रुग्ण पाहता ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लसबाधित रुग्णांची संख्या आता 21 वरून 45 वर गेली आहे. यात 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितलंय. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये डेल्टा चा व्हेरियंट आढळला आहे. असे असले तरी घाबरुन न जाता रुग्णालयात योग्य वेळी दाखल होण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. जालन्यात बोलत असताना टोपे यांनी वरील माहिती दिली आहे.
इतर बातम्या :
राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार? जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे सहकार विभागाचे आदेश
चोर समजून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना मारहाण, गाडीवरही दगडफेक, नेमकं काय घडलं?
Muharram 2021 Maharashtra Guidelines : मातम मिरवणुका नको, मोहरमसाठी नियमावली जारी
VIDEO : Tv9Podcast | बायकोच्या प्रियकराची हत्या, वास्तवातील “रुस्तम”ची थरारक कहाणी #Rustom #Nanavati #Podcast pic.twitter.com/tXiVXePx0V
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
(after Nashik Four Corona delta plus patients found in Thane health department on alert)