कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावर आता श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे महायुतीचे कार्यकर्ते सर्व कामाला लागलेले आहेत. मेळाव्याला सुरुवात झालेली आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष, मंत्री रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी आणि इतर पदाधिकारी एक दिलाने कामाला लागले आहेत. प्रचाराला सुरवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याणच्या जागेवर भाष्य केलं. तिथून शिवसेनाच लढेल, असं सांगितलं. त्याचं स्वागत करतो. कल्याणमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात मताधिक्याने निवडून येणार आहोत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
समर्थन युती म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे. स्वतःचा पर्सनल अजेंडा राबवला नाही पाहिजे. नुसतं कल्याण लोकसभा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये युती म्हणून काम करावं. डेव्हलपमेंट त्या मतदारसंघात केली नाही का?मोठ्या प्रमाणात राज्य सरकार केंद्र सरकारने इथे डेव्हलपमेंट केलेली आहे. हे वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत.कल्याण लोकसभा मध्ये हजारो कोटींची कामे झाली आहेत. अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. लोकसभेच्या अंतर्गत अनेक कामं होणार आहेत. लोक आमच्यासोबत आहेत. महायुतीचाच विजय होणार आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणावरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलं. या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. त्यांचा काय वैयक्तिक अजेंडा असेल ते मला माहित नाही. पक्षाचं नाव घेऊन युतीचं नाव खराब करण्याचं काम ते करत असतील गुंड प्रवृत्तीचे लोक वागत असतील. तर ते तसं कशासाठी वागत आहेत? त्यांचा अजेंडा काय आहे? हे समजून घेतलं पाहिजे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
कल्याणमध्ये गोळीबाराची घटना झाली. गोळीबार करण्यासाठी आम्ही नव्हतं सांगितलं. स्वतः त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन केले आहेत. अशा या युतीमध्ये वातावरण खराब करणं निवडणुकीमध्ये त्यांना रिलीफ मिळत असेल. त्या गोष्टी समर्थन करत असतील. त्यातून त्यांना साध्य करत असेल. त्यांनी ते विसरून जावे. ती चूक केली आहे. अशा गोष्टींचं भाजप देखील करत नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.