मद्यधुंद कारचालकाची रिक्षा आणि दुचाकी धडक; रिक्षाचा चेंदामेंदा, तिघांचा मृत्यू तर…

| Updated on: Dec 20, 2023 | 8:43 AM

Ambarnath Ulhasnagar Car Rickshaw bike Accident CCTV footage : अनेकजण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतात. अशात अपघात होतात. असाच एक भीषण अपघात समोर आला आहे. कार चालकाने मद्यधुद अवस्थेत कार रिक्षा आणि दुचाकी धडकवली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

मद्यधुंद कारचालकाची रिक्षा आणि दुचाकी धडक; रिक्षाचा चेंदामेंदा, तिघांचा मृत्यू तर...
Follow us on

उल्हासनगर, अंबरनाथ | 20 डिसेंबर 2023 : अंगाचा थरकाप उडवणारी बातमी… उल्हासनगरमध्ये भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात आलेल्या कारने रिक्षा आणि बाईकला धडक दिली. यात रिक्षाचा चक्काचूक झाला आहे. या अपघातांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. नशेखोर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आलीय. भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हास नगरच्या शांतीनगर भागात अपघात झाला होता. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्याण,बदलापूर राज्य महामार्गावरील शांतीनगर भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव कार चालवत रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून रिक्षातील तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला होता.  या अपघाताचा थराराचा सीसीटीव्हीत फुटेज समोर आलं आहे. आता या प्रकरणी कारवाई केली गेली आहे.

उल्हासनगरमधील शांतीनगर भागातून अंबरनाथच्या दिशेने एक भरधाव कार येत होती. या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका रिक्षाला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला तर दुचाकीवरील दोघांनाही या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सोमुदिप जाना, अंजली जाना तसेच शंभुराम चव्हाण या तीन जणांचा जागीच मृत्यु झाला. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले होते.

उल्हासनगरमधील या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तसेच कारमध्ये जखमी आणि मद्यधुंद अवस्थेत असलेला आरोपी लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली होती. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यावरून अपघाताची तीव्रता स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.