ठाणे : ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बाबतीत ९० दिवसांत तपास करण्यात आला. पुन्हा अतिरिक्त चौथी चार्जशीट ठाणे पोलिसांनी दाखल केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांत ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात चौथ आरोपपत्र दाखल करण्यात आलं. करमुसे मारहाण प्रकरणी करमुसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे पोलिसांत ५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आतापर्यंत चार आरोपपत्र दाखल करण्यात आले. चौकशी अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांना खूश करायचं आहे. तो प्रयत्न करत होता. त्या प्रयत्नात एक आत्महत्यासुद्धा झाली. त्याने आमच्या बोलावलेल्या प्रत्येक माणसांना काय-काय बोलला हे सगळ्यांनी मला येऊन सांगितलं. त्यामुळे त्या चौकशी अधिकाऱ्याची हतबलता आणि लाचारी दिसत होती.
राजकीय आकसापोटी ही कारवाई सुरू असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे आरोपपत्राला फारसं महत्त्व द्यायचं नसतं हे सर्व सुरूच असतं. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी ठाण्यामध्ये धावपळ सुरू असते. ज्यांनी माझं नग्न छायाचित्र काढलं होतं. आता मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाड याला येनकेन प्रकारे त्रास द्यायचा आहे. मला अडचणीत आणायचं आहे. मला घाबरवायचं आहे. पण, मी अडचणी किंवा बाकी कुठल्याही गोष्टीला घाबरत नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना त्यांचा बाबतीत घाणेरडे फोटो प्रदर्शित केले होते. त्यानंतर करमुसे यांना आव्हाड यांचा नाद या निवासस्थानी मारहाण करण्यात आली होती. न्यायालयीन लढाई सुरू असतानाच फिर्यादी असणारे करमुसे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
नंतर न्यायालयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात ५०० पानांची चार्जशीट दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.