Video : बदलापूरमध्ये जमावाचा उद्रेक झाल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Aug 20, 2024 | 5:16 PM

बदलापूरमध्ये मोठा जमाव अद्यापही रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन करत आहे. चिमुकलयांवर केलेल्या शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचाराच्या केल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास उशिर केला. मंगळवारी बदलापूरमधील वातावरण चांगलंच तापलं, रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलने करण्यात आली. अशातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे निर्णय घेतले आहेत.

Video : बदलापूरमध्ये जमावाचा उद्रेक झाल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
Follow us on

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी बदलापूरकरांनी थेट रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं. गेल्या पाच ते सहा तासांपासून हे आंदोलन सुरू असल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प आहे. सरकारडून मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधला. पण आंदोलक माघार घ्यायला तयार नसून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत. कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

 

बदलापूरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. शाळेतील लहान मुलींवर सफाई कर्मचारी याने अत्याचार केले. ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टाचा अहवाल मागवला आहे. नराधमांना कुठेही पाठीशी घातल जाणार नाही. कायद्यानुसार जे करता येईल ते राज्य सरकार करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितलं.