ठाणे : बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर तब्बल 10-10 फूट लांबीचे खड्डे पडलेबदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर तब्बल 10-10 फूट लांबीचे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांना इथून गाड्या चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतेय. (Badlapur Murbad Road potholes)
बदलापूर शहरातून मुळगाव आणि बारवी धरणामार्गे मुरबाडला जाणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरून मुरबाडसह माळशेज घाट, शिर्डी, अहमदनगर त्याचप्रमाणे शहापूर आणि नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी मोठी वाहतूक होत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीने या रस्त्याकडे लक्षच दिलेलं नाही.
त्यामुळे आधीच खड्डे आणि त्यात पावसाचं जमा झालेलं पाणी, यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे. चारचाकी गाड्यांचे चिमटे तुटणे, गाड्या खड्ड्यात बसून बंद पडणे, असे प्रकार तर या रस्त्यावर दररोज होत असतात. विशेषत: दुचाकी चालकांचे या रस्त्यावरून जाताना प्रचंड हाल होत असतात. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जातेय.
(Badlapur Murbad Road potholes)