Badlapur Protest | 9 तास वाट पाहिली अन् 15 मिनिटात हजारो लोकांना पळवलं, अंधार पडण्याच्याआधी बदलापूर स्टेशनवर पोलिसांची मोठी ॲक्शन

| Updated on: Aug 20, 2024 | 8:33 PM

Badlapur Protests : बदलापूर रेल्वे स्थानकावर गेल्या दहा तासांपासून आंदोलन सुरू होतं. दहा तास रेल्वे विभागाला याचा फटका बसला होती. मात्र आंदोलकांनी आपला ठिय्या काही हलवला नाही. अखेर पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजता लाठीचार्ज करत आंदोलकांना तिथून पळवून लावलं.

Badlapur Protest | 9 तास वाट पाहिली अन् 15 मिनिटात हजारो लोकांना पळवलं, अंधार पडण्याच्याआधी बदलापूर स्टेशनवर पोलिसांची मोठी ॲक्शन
Follow us on

बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये चिमुकलींंवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना फशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन केलं होतं. गेल्या दहा तासांपासून आंदोलन सुरू होतं. दहा तास रेल्वे विभागाला याचा फटका बसला होता. मात्र आंदोलकांनी आपला ठिय्या काही हलवला नाही. पोलिसांसह स्थानिक आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं, मात्र आंदोलक मागे हटले नाहीत अखेर पोलिसांन सौम्य लाठीचार्ज करावा लागला. बदलापूरमधील रेल्वे स्थानकामध्ये पटरीवर बसलेल्य आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात केला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली याला पोलिसांनीही दगडफेकर करत प्रत्तुत्तर दिलं. आता  बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आता ताबा मिळवला आहे.

आंदोलक बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पटरीवर बसल्याने सर्व वाहतूक खोळंबली होती. सकाळपासून पोलीस प्रशासन आणि सरकारने आंदोलकांना हात जोडून विनंती केली होती.  राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांंचे तत्काळ निलंबन करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं. मात्र आंदोलक आरोपीला फाशी द्या या मागणीवर ठाम होते.

सकाळपासून पोलिसांनी आंदोलकांना विनंती केली की तुम्ही आंदोलन सुरू ठेवा पण रेल्वे ट्र्रॅकवर बसून राहू नका.  मात्र आंदोलकांचा मोठा ताफा तिथे असलेला पाहायला मिळत होता. अंधार पडणार असल्याने पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजता लाठीचार्ज करायला सुरूवात कर गर्दी पांगवली. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली, पोलिसांनीही दगडफेक करणाऱ्यांवर दगडफेक करत प्रत्युत्तर दिलं. आंदोलकांनी बदलापूर स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या पोलिसांच्या गाड्याही फोडल्या आहेत. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही लोकांनाही ताब्यात घेतलं आहे. पोलीस प्रशासनाकडून महिला आंदोलकांना विशेष मदत केली जात होती. संध्याकाळ होत आल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. विरोधकांना लाज वाटली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी लाडकी बहिण योजनेचे पोस्टर घेऊन उभं केल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, आता बदलापूर रेल्वे स्टेशनला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही आता स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. पोलीस आता रिपोर्ट करत असून तो रेल्वे विभागाला पाठवण्यात येणार असून त्यानंतर लोकल सेवा सुरू होणार आहे.