बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर पालकांनी याविषयी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. पण त्याची दखल घेण्यात आली नव्हती. तर पोलिसांनी सुद्धा पालकांना गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास ताटकळवले होते. त्यानंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता त्या शाळेबाहेर पालकांनी पुन्हा गोंधळ घातला आहे. पालक आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. या सर्व प्रकरणानंतर पुन्हा मोठं आंदोलन होतं की काय अशी धास्ती निर्माण झाली. पण शाळा प्रशासकांनी या पालकांना माहिती दिल्यानंतर वातावरण निवळले.
सुरक्षेची माहिती द्या
बदलापूर येथे दोन लहान मुलीवर आत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून कडक कारवाई करण्यात आली. शाळा प्रशासन घरी पाठण्यात आले. प्रशासक नेमण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आणि पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पण सुरु झाले. त्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाली. तेव्हा पालकांनी पुन्हा गोंधळ घातला. पालकांची बैठक घेऊन लहान मुलांच्या सुरक्षेसाठी काय केले, याची माहिती द्या असा जाब पालकांनी विचारला.
शाळेबाहेर पालकांचा गोंधळ
शाळा सुरु होताच शाळेत सुरक्षेसाठी काय काय व्यवस्था केली आहे यांची पालकासोबत बैठक घेऊन माहिती देण्याची मागणी करत पालकांनी शाळे बाहेर गोंधळ घातला आणि प्रशासकांना जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळाने काय केले याची माहिती न देताच शाळा सुरु झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
चिमुकली सोबत घडलेल्या घटनांनंतर शाळेचा हलगर्जीपणा आढळल्याने राज्य सरकारने शाळेची व्यवस्थापन समिती बरखास्त करत प्रशासकाची नियुक्ती करून आज पहाटेपासून पाचवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग सुरू केले होते. मात्र शाळेत मुलीच्या सुरक्षेतेसाठी शाळा प्रशासनाकडून नेमकं काय केले गेले याची माहिती न दिल्याने संतप्त पालकांनी गेट वर गोंधळ घालत जाब विचारला. शाळा प्रशासनाने पालकांना कार्यालयात बोलून घेत माहिती याविषयीची माहिती दिली.