कल्याण : महावितरणचे विजेचे थकित बिल वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. या प्रकरणी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ग्राहकाला अटक केली आहे. मोहनदास नायर असे अटक मारहाणा करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे.
महावितरणने सध्या वीज बिल वसुलीची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत महावितरण ग्राहकांकून थकीत वीज बिल वसुल करण्यात येत आहे. सलग दोन महिने वीजबिल थकबाकी ठेवणाऱ्या ग्राहकावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वीज बिल भरले नसेल तर महावितरणकडून थेट वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोड येथील सरस्वती सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहनदास नायर यांच्या वीज बिलाची थकबाकी होती. त्यांचे 900 रुपयाचे वीज बिल थकीत आहे. यामुळे या बिलाच्या वसुलीसाठी मोहनदास यांच्या इमारतीमध्ये महावितरणच्या दोन महिला कर्मचारी गेल्या होत्या. सविता काटे आणि पल्लवी टोळे अशी या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कर्मचाऱ्यांनी मीटर काढताच मोहनदास संतापले. याच संतापाच्या भरात मोहनदास यांनी त्यांच्या हातातील वीज मीटर खेचून घेत सविता यांना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली.
याप्रकरणी सविता काटे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोहनदास विरोधात तक्रार दाखल केली. सरकारी कर्मचारी आणि महिलेवर हात उगारल्या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मोहनदास विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Beating of a female employee of MSEDCL who went to collect electricity bill)
इतर बातम्या