गुंड घेऊन शहरातील वातावरण खराब करणारा डोंबिवलीतील तो राजकीय व्यक्ती कोण ? , भाजप आक्रमक

| Updated on: Mar 12, 2022 | 6:04 PM

मिडियाशी बोलताना आमदार चव्हाण यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. या प्रकरणात 307 कलम लावलेले नाही. दुसरीकडे पोलिसांचा तपास दिशाभूल करणारा आहे. या संदर्भात पोलिसांना आरोपी कोण आहे याचा क्लू दिला आहे. या प्रकरणात राजकीय व्यक्ती असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

गुंड घेऊन शहरातील वातावरण खराब करणारा डोंबिवलीतील तो राजकीय व्यक्ती कोण ? , भाजप आक्रमक
मनोज कटके हल्ला प्रकरणी भाजप आक्रमक
Follow us on

कल्याण : शहरात काही वाईट प्रवृत्तीचे लोक गुंड घेऊन शहराचे वातावरण खराब करीत आहे. राजकीय व्यक्ती या हल्ल्यामागे असल्याचा क्लू आम्ही पोलिसांना दिला आहे. हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे. तपास लागत नाही. ही बाब दिशाभूल करणारी आहे. येत्या मंगळवारी भाजप (BJP) रामनगर पोलिस स्टेशनसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली आहे. भाजप कार्यकर्ते मनोज कटके (Manoj Katke) हल्ला प्रकरणी आरोपी मोकाट आहेत. यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी डोंबिवलीत भाजप मिडिया सेल प्रभारी मनोज कटके यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 12 दिवस उलटून देखील अद्याप या प्रकरणात आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. (BJP is aggressive in the Manoj Katke attack case in Dombivali)

आरोपीच्या अटकेबाबत पोलिसांना जाब विचारला

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनोज कटके यांची डोंबिवलीत येऊन भेट घेतली होती. आरोपी सापडले नाही तर भाजप मोर्चा काढणार. त्या मोर्चाचे नेतृत्व मी स्वत: करणार असे फडणवीस यांनी सांगितले होते. आज भाजप आमदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिलाध्यक्षा पूनम पाटील, नगरसेवक विकास म्हात्रे, मंदार हळबे, मंदार टावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी रामनगर पोलिस ठाण्यात जमले. भाजप आमदार चव्हाण यांनी कल्याणचे डीसीपी गुंजाळ यांची भेट घेतली. मनोज कटके यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी अद्याप अटक का केली जात नाही असा जबाब विचारला.

आमदार चव्हाण यांच्याकडून गंभीर स्वरुपाचे आरोप

मिडियाशी बोलताना आमदार चव्हाण यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. या प्रकरणात 307 कलम लावलेले नाही. दुसरीकडे पोलिसांचा तपास दिशाभूल करणारा आहे. या संदर्भात पोलिसांना आरोपी कोण आहे याचा क्लू दिला आहे. या प्रकरणात राजकीय व्यक्ती असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अद्याप आरोपी मिळाला नाही तपासाला दिशा लागत नाही म्हणून येत्या मंगळवारी पोलिस ठाण्यासमोर भाजपकडून उपोषण केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपच्या या दबाव तंत्रानंतर आता पोलिस पुढील तपास काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (BJP is aggressive in the Manoj Katke attack case in Dombivali)

इतर बातम्या

‘परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो’, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी

Video: बाप जैसी बेटी, पंजाबमध्ये 12 महिलांना आपने तिकीट दिलं, 11 जिंकल्या, कशा? केजरीवालांच्या मुलीचं हे भाषण ऐका