माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

| Updated on: Sep 08, 2021 | 1:05 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya)

माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
Kirit Somaiya
Follow us on

ठाणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. (bjp leader Kirit Somaiya serious allegations to maharashtra ministers)

किरीट सोमय्या आज ठाणे महापालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. आयुक्ताशीं भेटण्यापूर्वी मीडियाशी बोलताना सोमय्या यांनी हा गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचे गुंड धमकावत आहेत

मी माझे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत. उद्धव ठाकरे यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत. पण मी सुरक्षा मागितली नाही. मागणारही नाही. माझाबाबत जी धमकी आली ते फक्त नाटक आहेय नुसती एनसी पोलिसांनी घेतली, असंही ते म्हणाले.

परब, सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम तुटणार

मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला गेला. आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना निवडले आहे, असं ते म्हणाले.

ते मोदी होऊ शकत नाहीत

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 21 पक्ष आणि 21 नेते समोर येत आहेत. मग ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, राहुल गांधी असो या सोनिया गांधी. पण हे 21 लोक एक होऊन मोदी होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सोमय्यांना सुरक्षा

दरम्यान, सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल 40 CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल. सोमय्यांना Z दर्जाची (Z security) सुरक्षा असेल. महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल. (bjp leader Kirit Somaiya serious allegations to maharashtra ministers)

 

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारविरुद्ध वात पेटवली, मोदी सरकारने सुरक्षा पुरवली, किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच!

शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल

उद्धव ठाकरे इलेव्हन दिवाळीपर्यंत तुरुंगात, आव्हाड तुम्हीही बॅग भरा; किरीट सोमय्यांचा थेट इशारा

(bjp leader Kirit Somaiya serious allegations to maharashtra ministers)