VIDEO | कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Dec 12, 2021 | 6:38 PM

अमित चिकणकर हे कल्याण ग्रामीण भागातील भाल गावात राहतात. याच परिसरात त्यांचे पक्षाचे कार्यालय आहे. डोंबिवली ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या परिसरात पक्षाचे काम सुरू केले.

VIDEO | कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण
Follow us on

कल्याण : भाजपचा पक्षाचा विस्तार का करतो या रागातून काही तरुणांनी भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षवर हल्ला केल्याची घटना कल्याण ग्रामीणमध्ये घडली आहे. अमित चिकणकर असे हल्ला करण्यात आलेल्या युवा अध्यक्षाचे नाव आहे. आधी दोन तरुणांनी अमित यांच्याशी वाद घातला. त्यानंतर अमित घरी जात असताना त्यांची गाडी थांबवून दोन जणांनी त्याच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. अमित यांना मारहाणही केली. मात्र अमित कसे बसे त्यांच्या तावडीतून सुटून निसटले. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान वादावादीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

भाजपचा प्रचार केला म्हणून मारहाण

अमित चिकणकर हे कल्याण ग्रामीण भागातील भाल गावात राहतात. याच परिसरात त्यांचे पक्षाचे कार्यालय आहे. डोंबिवली ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या परिसरात पक्षाचे काम सुरू केले. अमित आपल्या पक्षाचा प्रसार करतात म्हणून काही दिवसांपासून काही तरुण त्यांच्याशी वाद घालत होते. नेहमीप्रमाणे काल अमित कार्यलयाबाहेर उभे असताना सायंकाळी काही तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी अमित यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. मात्र ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्यातील वाद मिटला. त्यानंतर अमित त्यांच्या घरी निघून गेले.

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

अमित आपल्या गाडीने घरी जात असताना तिघे जण आले आणि त्यांनी अमितची गाडी अडवली. गाडीवर दगड घातला व अमित यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र अमित त्यांच्या तावडीतून निसटले. याप्रकरणी अमित यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी देखील घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. (BJP Yuva Morcha president beaten for campaigning for the party)

इतर बातम्या

MHADA exam| पुणे पोलिसांनी ‘म्हाडाचा पेपर’ फोडणाऱ्या टोळीवर अशी केली कारवाई ; जाणून घ्या नेमके काय घडले?

Dombivali Crime : घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई वडिलांना मारहाण, सुसंस्कृत डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार