Dombivli News : लोकांमध्ये बिनधास्त फिरणारे माकड पकडण्यासाठी दोन महिने लागले, रेस्क्यू करणारी टीम म्हणाली…

| Updated on: Aug 03, 2023 | 9:47 AM

dombivli news today : शहरात माकडं बिनधास्त फिरत असल्याचे आपण पाहतो. त्यांना ज्या ठिकाणी खायला मिळणार आहे, अशा ठिकाणी माकडं तिथल्या झाडांवर असल्याचं पाहायला मिळतं. डोंबिवलीत एका माकडाला पकडण्यासाठी दोन महिने लागले.

Dombivli News : लोकांमध्ये बिनधास्त फिरणारे माकड पकडण्यासाठी दोन महिने लागले, रेस्क्यू करणारी टीम म्हणाली...
monckey rescue dombivali
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डोंबिवली : दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा माकड (dombivli news today) अखेर जेरबंद करण्यात आल्यामुळे डोंबिवलीतल्या अनेकांना आनंद झाला आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून हे माकडं अनेकांना त्रास देत होतं. त्याचबरोबर लोकांच्यात बिनधास्त फिरत होतं. सेवा ट्रस्ट , वॉर संघटनेने वनविभागाच्या (forest department) मदतीने परिसरात जाळीचा सापळा लावून त्या माकडाला जेरबंद केलं आहे. बोनेट मकाक (Bonnet macaque) या जातीचं माकडं असून मदारी कडून निसटल्यानंतर शहरात जेवणासाठी परिसरात नागरिकांच्या दरवाजे खिडक्या वाघोलीत धुमाकूळ घालत होता. माकडाने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यापासून अनेकांनी त्या माकडाचा धसका घेतला होता. माकडं दिसलं की लोकं इकडं तिकडं पळायची.

बिंधास्तपणे लोकांमध्ये फिरत होतं

डोंबिवलीत गेले दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला पकडण्यास सेवा ट्रस्ट , वॉर संघटना आणि वनविभागाला अखेर यश आले आहे. बोनेट मकाक असे या माकडाची जात असून प्राणी संघटनेच्या माहितीनुसार हा माकड रस्त्यावर खेळ दाखवणाऱ्या मदनीच्या तावडीतून सुटून शहरात फिरत होता. मदनीसोबत लोकांच्या सहवासात राहत असल्याने या माकडाला लोकांची भीती वाटत नसून तो बिंधास्तपणे लोकांमध्ये फिरायचा.

या कारणामुळं लोकं त्याला घाबरायची

शहरात या माकडाला खाण्यासाठी फळ मिळत नसल्याने हा माकड डोंबिवली परिसरातील इमारतीत प्रवेश करुन लोकांचे दरवाजे व खिडक्या वाजवत खाण्यासाठी मागायचा. परंतु त्या माकडाचं शरिर अधिक असल्यामुळे लोकं त्या घाबरत होती. अनेकदा माकडं खाली दिसल्यानंतर लोकं पळून जायची. त्याला खायला मिळत नसल्यामुळे माकडाने डोंबिवली परिसरामध्ये धुमाकूळ घातला होता.

हे सुद्धा वाचा

जेरबंद करण्यासाठी…

लोकांच्या घरात घुसून कपडे फाडणे, वस्तू तोडणे, लोकांच्या हातातल्या व घरातून खाण्याच्या वस्तू पळवण्यास सुरवात केली होती. या सर्व प्रकारच्या तक्रारी प्राणी मित्र संघटने कडे आल्याने सेवा ट्रस्ट, वॉर संघटना व वनविभाग टीमच्या मदतीने पंधरा दिवस परिसरात रेस्क्यू करत जाळीचा सापळा लावून या माकडाला जेरबंद केले आहे असल्याची माहिती सेवा ट्रस्ट प्राणी मित्र संघटना कार्यकर्ता, निहार सपकाळ याने सांगितली.