ठाणे: तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिला. (CM Uddhav Thackeray calls Kalpita Pimple, the Injured Thane Civic Official)
महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळेंशी बोलणं करून दिलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच त्यांच्यापाठी सरकार खंबीरपणे उभे असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवलं… तु्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांकडून अतिक्रमण विभागाच्या सुरु असलेल्या कारवाईची माहिती घेतली. जी घटना घडली तशी हिंमत पुन्हा कोणाची होता कामा नये, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. तसेच महापौरांनी पाठवलेल्या सानुग्रह अनुदानाची फाईल निकाली काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर कल्पिता पिंपळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून माझी विचारपूस केली. त्यांनी मला जो धीर दिला आहे त्यामुळे मला एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात बळ आले आहे. त्यामुळे बरे वाटले, असं कल्पिता पिंपळे म्हणाल्या. ताई तुम्ही कशा आहात? लवकर बरे व्हा, असे सांगत जो कोणी असेल त्यांच्यावर कडक शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असं त्या म्हणाल्या. आज बोटावर पुन्हा एक शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र हा तर माझा पर्सनल लॉस झालेला आहे, असे पिपळे यांनी सांगितले आहे. मात्र पुन्हा एकदा मी बरे झाल्यावर कामावर येणार आहे. पालिका आणि सर्व जण माझा पाठीशी आहेत. त्याचबरोबर आरोपीला कडक शासन म्हणून फास्ट ट्रॅकवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात आधी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनीही फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
“लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो”, असा शब्द त्यांनी कल्पिता पिंगळे यांना दिला. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असंही राज ठाकरे म्हणाले होते. (CM Uddhav Thackeray calls Kalpita Pimple, the Injured Thane Civic Official)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 September 2021 https://t.co/bgMLl72ffY #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 3, 2021
संबंधित बातम्या:
राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!
(CM Uddhav Thackeray calls Kalpita Pimple, the Injured Thane Civic Official)