ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका हद्दीतील सर्व दुकाने शनिवारी आणि रविवार बंद (shutdown on Saturday and Sunday) ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryawanshi) यांनी दिला आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत शनिवार, रविवारी बंद राहतील. (Corona patient increase Kalyan Municipal Commissioner Dr. Vijay Suryawanshi implemented shutdown on Saturday and Sunday)
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक जिल्ह्यांत वेगवेगळे नर्बंध लागू केले जात आहेत. हीच परिस्थिती कल्याण आणि डोंबिवली येथे आहे. येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे येथे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे मनपा हद्दीत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता येथे सर्व दुकनं आणि आस्थापना बंद असणार आहेत.
मनपा आयुक्तांनी घेतलेल्या आदेशानुसार आता शनिवार आणि रविवारी बंद पाळण्यात येणार आहे. यावेळी शहरातील फेरीवाल्यांनाही पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. या काळात शनिवार आणि रविवारी भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. तसेच रेस्टारंट, हॉटेल, बारला पार्सल सेवा देता येईल. डी मार्ट आणि मॉल्सदेखील 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील.
दरम्यान, कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे होळी साजरी करण्यावर महापालिकेकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायटीच्या आवारात होळी अथवा रंगपंचमी साजरी केली जाणार असेल तर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. होळीच्या काळात ज्या व्यक्ती नियम मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.
इतर बातम्या :
Maharashtra Night curfew मोठी बातमी : राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
(Corona patient increase Kalyan Municipal Commissioner Dr. Vijay Suryawanshi implemented shutdown on Saturday and Sunday)