ठाणे : उल्हासनगरमध्ये एका नागरिकाच्या घरी साप घुसल्यानंतर संबंधित नागरिकाने थेट नगरसेवकालाच फोन केला. यानंतर या नागरिकाच्या घरी दाखल झालेल्या नगरसेवकाने कोणतंही प्रशिक्षण नसताना सापाला पकडलं. भरत गंगोत्री असं या नगरसेवकाचं नाव असून त्यांच्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाचमधील हिललाईन पोलिस ठाण्याजवळ गोल्डन पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत तळमजल्यावर कुमार श्यामदासानी हे वास्तव्याला आहेत. बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कुमार यांना त्यांच्या बेडरूममध्ये एक साप असल्याचं आढळलं. त्यामुळे घाबरलेल्या कुमार यांनी थेट त्यांचे नगरसेवक भरत गंगोत्री यांना फोन करून मदतीसाठी पाचारण केलं.
भरत गंगोत्री यांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली, मात्र दरम्यानच्या काळात अग्निशमन दल किंवा सर्पमित्रांची वाट न पाहता गंगोत्री यांनी स्वतः जाऊन हा साप पकडला.
हा साप वोल्फ जातीचा असून तो बिनविषारी आहे, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली. मात्र गंगोत्री यांना या सापाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. तसंच हा साप विषारी आहे की बिनविषारी? हे देखील त्यांना ठाऊक नव्हतं. मात्र तरीही त्यांनी सापाला पकडण्याचं केलेलं धाडस कौतुकास्पद म्हणावे लागेल.
(Corporator catches snake in citizen bedroom, praises corporator Bharat Gangotri courage Ulhasnagar Thane Maharashtra)
हे ही वाचा :
आई-बाबांचा रोष पत्कारत लव्हमॅरेज केलं, पण लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या
अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर