ठाणे : फेरीवाला बनून सोसायट्यांमध्ये रेखी करून दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारां (Two Criminals)ना ठाण्यातील कळवा पोलिसांनी शिताफीने अटक (Arrest) केली आहे. शेखर नटराज नायर आणि देवेंद्र गणेश शेट्टी अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. हे गुन्हेगार सराईत असल्या कारणाने ते आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होते. त्यामुळे त्यांना शोधन पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या दोघांना पोलिसांनी CCTV मार्फत शिताफीने अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 12 तोळे वजनाचे 6 लाखाचे सोन्याचे ऐवज हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सहा महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला. त्यांच्या विरोधात याआधी देखील अनेक शहरांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. (Criminals in the guise of peddlers stole during the day, Accused arrested on CCTV basis)
ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषा नगर परिसरात राहणाऱ्या स्मिता मालवणकर या गृहिणी घरातून कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या आरोपींनी दिवसाढवळ्या घराचे टाळे तोडून फक्त 20 मिनिटांमध्ये घरातील 6 लाख 58 हजार रुपये किंमतीचे सुमारे 12 तोळे सोन्याचे ऐवज लंपास करून पोबारा केला. स्मिता या घरी परतल्यानंतर घराचे टाळे तुटून दरवाजा उघडा असून घरातील सर्व दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर महिलेने तात्काळ कळवा पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्हीचा माघ काढत त्या आरोपींचा शोध घेतला असता ते आरोपी हे बदलापूर येथील वांगणी परिसरात राहत असल्याचे कळले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा या आरोपींचा माघ काढला असता ते नालासोपारा येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता हे दोघेही आरोपी हे मुळचे कर्नाटक आणि तामिळनाडू येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. हे दोघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात ठाण्यातील एमएफसी, बदलापूर, मुंबईतील कांदिवली, पालघर अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींची सहा महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटका होऊन बाहेर आले होते. त्यानंतर या दोघांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला आहे. या दोन्ही आरोपींसोबत त्यांची एक सहकारी महिला अद्याप फरार आहे. तिचा शोध कळवा पोलिस करत आहेत. या दोन्ही आरोपींना कळवा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Criminals in the guise of peddlers stole during the day, Accused arrested on CCTV basis)
इतर बातम्या
Pune crime | पुण्यात टुरिस्ट गाडी चालवण्याच्या बहाण्याने चालवत होते वेश्या व्यवसाय ; दलालांना अटक
Nanded Drown Death : गोदावरी नदीत महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू