बोकडाचा मृत्यू आणि शकील यांचे ते स्वप्न अपुरेच राहिले, ईदपूर्वीच मालकाला बसला धक्का

| Updated on: Jun 20, 2023 | 6:45 PM

या पैशातून मालक गावासाठी शाळा सुरू करणार होते. शिवाय रुग्णांना शहरात रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका खरेदी करणार होते. पण, आजार झाल्यामुळे या बोकडाचा मृत्यू झाला.

बोकडाचा मृत्यू आणि शकील यांचे ते स्वप्न अपुरेच राहिले, ईदपूर्वीच मालकाला बसला धक्का
Follow us on

निनाद करमरकर, प्रतिनिधी, ठाणे : ईदला बोकड कापले जातात. चांगल्या दर्जाच्या बोकडांची किंमत जास्त मिळते. पण, अंबरनाथमध्ये एक असा बोकड होता की, त्याची किंमत लाखात नव्हे तर कोटीत होती. त्याचे कारणही तसेच होते. या बोकडाच्या अंगावर अल्लाह आणि मोहम्मद असे नैसर्गिकरीत्या लिहिले होते. त्यामुळे या बोकडाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत गेली. ईदला तो बोकड विकून त्यापासून मालकाला पैसे मिळणार होते. या पैशातून मालक गावासाठी शाळा सुरू करणार होते. शिवाय रुग्णांना शहरात रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका खरेदी करणार होते. पण, आजार झाल्यामुळे या बोकडाचा मृत्यू झाला. त्यामुळे बोकड मालकाचं ते स्वप्न अधुरंच राहीलं.

किंमत एक कोटी १२ लाख

अंबरनाथच्या सिद्धार्थनगर परिसरातील शकील शेख याच्या बोकडाच्या अंगावर अल्लाह आणि मोहम्मद असं नैसर्गिकरित्या लिहिलेलं होतं. त्यामुळे या बोकडाची किंमत तब्बल १ कोटी १२ लाख ७८६ रुपये इतकी ठेवण्यात आली होती. या पैशातून गावी शाळा बांधण्याचं शकीलचं स्वप्न होतं. मात्र या बोकडाचा ईदपूर्वीच आजारपणाने मृत्यू झाला आहे.

 

हे सुद्धा वाचा

रोज फळं आणि ड्रायफ्रूट्स मिळायचे

हा बोकड तब्बल १०० किलो वजनाचा होता. तसंच त्याला दररोज फळं, ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी दिले जात होते. बोकड विकल्यानंतर आलेल्या पैशातून गावी शाळा बांधणं आणि एक रुग्णवाहिका गावाला देणं असं शकीलचं स्वप्न होतं. मात्र दुर्दैवाने या बोकडाचा ईदपूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे शकीलचं स्वप्न भंगलं आहे.

बोकडाचे वजन १०० रुपये

या बोकडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा बोकड १०० किलो वजनाचा होता. या बोकडाची खुरागही भारी होती. त्याला रोज फळ चारली जात होती. शिवाय ड्रायफ्रूट्सही दिले जात होते. त्यामुळे सुडौल असा हा बोकड होता. या बोकडापासून मिळालेल्या पैशातून काहीतरी चांगले करण्याची शकील यांची भावना होती. पण, या बोकडाच्या मृत्यूने त्यांच्या सर्व आशा मावळल्या. शिवाय ज्यांनी या बोकडासाठी बोली लावली होती. तेही दुःखी झाले.