चौथ्या दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा सापडले मानवी अवशेष, डोंबिवली स्फोटातील बेपत्ता मजुरांचा शोध सुरुच

| Updated on: May 26, 2024 | 8:35 PM

डोंबिवलीत केमिकल कंपनीत तीन दिवसांपूर्वी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर अजूनही अनेक मजूर बेपत्ता आहेत. त्यामुळे बचाव पथकाकडून अजूनही शोध मोहीम सुरु आहे. शोध मोहीमेचा आज चौथा दिवस होता. चौथ्या दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये आज पुन्हा मानवी अवशेष सापडले आहेत.

चौथ्या दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा सापडले मानवी अवशेष, डोंबिवली स्फोटातील बेपत्ता मजुरांचा शोध सुरुच
चौथ्या दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा सापडले मानवी अवशेष
Follow us on

तीन दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसी 2 मध्ये कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, कंपनीपासून 2 किमीपर्यंत जमीन हादरली होती. कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील इमारती आणि घरांचे अक्षरश: काचा फुटल्या होत्या. दुकानांच्या गाळ्याचे लोखंडी शटर निघाले होते. रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. स्फोटाचा आवाज हा कानठळ्या बसतील इतका मोठा होता. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही गिंळकृत केलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले होते. या आगीत 60 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. तसेच आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती सध्या तरी समजत आहे. या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

डोंबिवली अनुदान कंपनी रासायनिक स्फोटाच्या घटनेचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 10 जणांचा मृत्यदेह तर काही प्रमाणात मानवी अवशेष मिळाले होते. सध्या या प्रकरणात 12 जणांचे मिसिंग असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार 6 जणांच्या मृतदेहांमधील 3 जणांची ओळख पटली आहे. 7 जणांचा मृतदेह आणि मिळालेल्या मानवी अवशेष डीएनए चाचणीसाठी मुंबई कलीना रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या संबंधित कुटुंबाला त्यांचा मृतदेह देण्यात येणार आहे.

मात्र तरीदेखील आज चौथ्या दिवशीही या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन बंद झाल्यानंतर पोलीस महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशामक दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. सायंकाळी अंधार झाल्यानंतर त्यांनीही सर्च ऑपरेशन बंद केले. दरम्यान, आज चौथ्या दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये मानवी अवशेष मिळाले आहेत. ते डीएनए तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर आपला घरचा सदस्य मिळाला नाही म्हणून कंपनी परिसरात कामगारांचे कुटुंबिय कंपनीच्या परिसरात फिरत आहेत. उद्या पुन्हा या ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात येणार आहे.