Marathi News Maharashtra Thane Dombivli To Thane in just 20 minutes by vehicle,mothagaon mankoli bridge is being ready in two months.
डोंबिवलीने केवळ 20 मिनिटांत ठाणे गाठता येणार, हा ब्रिज होतोय दोन महिन्यात तयार
डोंबिवली आणि ठाणे दरम्यान लोकल सेवा बंद असल्यास हा पर्यायी मार्ग मिळणार आहे. माणकोली ते मोठागाव पुलाने डोंबिवली ते ठाणे या प्रवासाला अवघे 20 ते 30 मिनिटे लागतील.
Mothagaon Mankholi
Image Credit source: socialmedia
Follow us on
मुंबई | 19 जुलै 2023 : भिवंडीतील माणकोली ते डोंबिवली ( Mothagaon-Mankoli Bridge ) दरम्यान उल्हास खाडीवर सहापदरी पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून या प्रकल्पाचे काम आता पर्यंत 94 % पूर्ण झाले आहे. हा पुल येत्या दोन महिन्यात सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. अलिकडे एमएमआरडीएच्या ( MMRDA ) अधिकाऱ्यांनी या पुलाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे.कल्याण आणि डोंबिवलीकरांना या पुलाच्या निर्मितीमुळे ठाणे आणि मुंबईत जलदगतीने पोहचता येणार आहे. एमएमआरडीएच्यावतीने या सहा पदरी पुलाचे काम उल्हास खाडीवर करण्यात येत आहे. कल्याणचे लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने या पुलाच्या बांधकामाने वेग घेतला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाची पाहणी नुकतीच एमएमआरडीए केली. डोंबिवली आणि भिंवडीकरांना या पुलाचा फायदा होणार आहे. त्यांना अवघ्या वीस मिनिटात रस्ते मार्गाने ठाण्यात पोहचता येणार आहे.
लोकल ठप्प झाल्यास पर्यायी मार्ग
डोंबिवली आणि ठाणे दरम्यान लोकल सेवा बंद असल्यास हा पर्यायी मार्ग मिळणार आहे. माणकोली ते मोठागाव पुलाने डोंबिवली ते ठाणे या प्रवासाला अवघे 20 ते 30 मिनिटे लागतील. उल्हासनदीला पार करण्यासाठी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याहून पुढे जाण्यासाठी सध्या कोणताही पुल नाही. ज्यांना ठाणे ते डोंबिवली रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी त्यामुळे प्रचंड ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत असतो.
प्रवाशांना मुंबई ते नाशिक महामार्गाने कोनगाव, दुर्गाडीहून कल्याण पूर्वपर्यंत राजनोली फोर्कच्या माध्यमाने प्रवास करावा लागतो. यामुळे डोंबिवली ते ठाणे प्रवासाला दीड तासांचा वेळ लागतो. प्रवाशांचा हा वेळ वाचण्यासाठी माणकोली जवळ या सहा पदरी पुलाची निर्मिती होत आहे. पुल एकदा का सुरु झाली की हे अंतर कमी होऊन केवळ अर्धा तास लागणार आहे.
माणकोली आणि मोठागांव या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून दोन महिन्यात तो उघडण्यात येईल अशी माहीती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण होताच डोंबिवली ते ठाण्याचा प्रवास सध्याच्या वेळेपेक्षा अर्ध्याहून कमी वेळेत होईल तसेच प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. या पुलाला माणकोली क्षेत्रातील जमिन संपादन करण्यात झालेल्या दिरंगाईने उशीर झाला आहे.