VIDEO : पावसाचं पाणी अतिशय शुद्ध, मग हा नाला हिरवागार कसा? डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

| Updated on: Jul 19, 2021 | 2:47 PM

डोंबिवलीच्या गांधीनगरमध्ये एक विचित्रप्रकार समोर आला. गांधीनगरमधील नाल्याला हिरवा रंग आलेला बघयाला मिळतोय.

VIDEO : पावसाचं पाणी अतिशय शुद्ध, मग हा नाला हिरवागार कसा? डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
पावसाचं पाणी अतिशय शुद्ध, मग हा नाला हिरवागार का?
Follow us on

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत रविवारी (18 जुलै) दिवसभर पाऊस पडला. त्यानंतर रात्री पावसाचा वेग आणखी वाढला. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, डोंबिवलीच्या गांधीनगरमध्ये एक विचित्रप्रकार समोर आला. गांधीनगरमधील नाल्याला हिरवा रंग आलेला बघयाला मिळतोय. या हिरव्या नाल्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मात्र या नाल्याला हिरवा रंग का आला? यामागील कारण हे प्रदूषण आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या ठिकाणी जल आणि वायू प्रदूषणाच्या तक्रारी नागरीकांकडून करण्यात येतात. आज पुन्हा त्याचाच प्रत्यय आला. डोंबिवलीतील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्यातून हिरव्या रंगाचं पाणी जोरोने वाहू लागले. या हिरव्या रंगाचा नाला पाहून नागरीकांनी त्याच्या विरोधात आवाज उठविला. काही नागरिकांनी या हिरव्या रंगाचा नाल्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे संबंधित व्हिडीओ प्रचंड व्हायरलही होत आहेत.

आमदार राजू पाटील यांचं ट्विट

संबंधित नाल्याच्या व्हायरल व्हिडीओजची दखल कल्याण पूर्व ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर याबबतचा व्हिडीओ शेअर करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली आहे. “डोंबिवलीकरांची या जीवघेण्या प्रदुषणापासून सुटका कधी होणार? गांधीनगरचा हा नाला बंधिस्त करावा किंवा पाईपलाईनद्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे यासाठी केडीएमसी आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच होताना दिसत नाहीत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजी जरा लक्ष द्या”, असं राजू पाटील म्हणाले.

संबंधित कंपनीवर अखेर कारवाई

या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे. त्यांनी एमआयडीसीकडे संपर्क साधला. एमआयडीने याप्रकरणी नाल्यात केमिकल सोडणाऱ्या रायबो फाम या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहे.

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर चाप कधी बसणार?

पावसाच्या पाण्याचा प्रवाहावाचा गैरफायदा घेत कंपनीने त्यात केमिकल सोडले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची बाब आयुक्तांनी नमूद केली आहे. दरम्यान 2014 साली डोंबिवली प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला होता. तर 2019 मध्ये डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाला होता. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती. त्यानंतरही प्रदूषण करणाऱ्या कंपन्या सुधारल्या नाही तर त्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र, अद्यापही कंपन्या सुधरलेल्या नाही, असंच दिसत आहे.

हेही वाचा :

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

Mumbai Rains Live Updates | बोरिवली परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्ते जलमय