डोंबिवली : श्रीलंकेत शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी एका वृद्ध शिपिंग एजंटचे अपहरण केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. सुभाशिष बॅनर्जी(65) असे अपहरण करण्यात आलेल्या शिपिंग एजंटचे नाव आहे. याप्रकरणी बॅनर्जी यांच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी बॅनर्जी यांची सुटका करीत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
श्रीलंकेत शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन तरुणांनी मनजीत यादव नावाच्या शिपिंग एजंटला तीन लाख रुपये दिले होते. मनजीत यादवने हे काम करण्यासाठी पैसे सुभाशिष बॅनर्जीकडे दिले. त्यानुसार बॅनर्जीने तीन तरुणांचे नोकरीचे काम केले. श्रीलंकेला जाण्याची तारीखही निश्चित झाली. तरुणांचा कामाचा व्हिजाही बनवण्यात आला. यासाठी तीन लाख रुपये खर्च झाले. मात्र तितक्यात तिन्ही तरुणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तिघांना 15 दिवस क्वारन्टाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या व्हिजाची मुदत संपली. त्यामुळे हे तरुण श्रीलंकेला जाऊ शकले नाहीत.
दरम्यान तरुणांच्या नोकरीचे काम न झाल्याने मनजीत यादव याने बॅनर्जीकडे तीन लाख रुपये परत मागितले, तेव्हा बॅनर्जीने हे पैसे व्हिजासाठी खर्च झाल्याचे सांगितले. वारंवार तगादा लावूनही बॅनर्जीकडून पैसे मिळत नसल्याने मनजीत यादवने पैसे मिळवण्यासाठी दोन साथीदारांच्या मदतीने बॅनर्जीचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सुनिल तारमळे आणि दत्तात्रय सानप यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.
या दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच मोबाईल लोकेशनद्वारे तपास सुरु झाला. त्यानुसार नालासोपारा येथील गोराई नाकाजवळील एका हॉटेलमधून बॅनर्जी यांची सुटका केली. पोलिसांनी मनजीतसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. तिघे आरोपी उत्तर प्रदेशात राहणारे आहेत. धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव अशी मनजीतच्या अन्य दोन साथीदारांची नावे आहेत. (Elderly shipping agent abducted for Rs 5 lakh in Dombivali)
इतर बातम्या
pimpri chinchwad crime |दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यांवर पोलिसांची कारवाई ; अशी केली अटक
Aurangabad | मुजोर रिक्षाचालकांनी औरंगाबादेत गुंडगिरी, प्रवाशाला बेदम मारहाण, भररस्त्यात राडा!
Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक