केडीएमसीतील धक्कादायक प्रकार, अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप

| Updated on: Dec 24, 2024 | 7:57 PM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम होत आयुक्तांच्या दालनात गोंधळ घातला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.

केडीएमसीतील धक्कादायक प्रकार, अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप
केडीएमसीतील धक्कादायक प्रकार, अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ आणि विनयभंगाचा गंभीर आरोप
Follow us on

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनिल वाळुंज यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याकडून मानसिक छळ करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात गोंधळ घालून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात त्वरित निलंबन करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, “या अधिकाऱ्याला निलंबित करा. अन्यथा आयुक्तांच्या दालनातून हलणार नाही”, अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र आयुक्त सध्या उपलब्ध नसल्यामुळे, पालिकेचे सचिव किशोर शेळके यांनी मध्यस्थी केली आणि संबंधित अधिकाऱ्याविरोधात योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा इशारा

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याच्या कारवाईवरून आपली नाराजी व्यक्त करत, “तुम्ही दोन दिवसांत या अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही तर त्या पाणी खात्याच्या अधिकाऱ्याला पाण्यातच बुडवून शिवसेना स्टाईलने मारणार. त्याचबरोबर महिला कर्मचारी कोणाला या गोष्टी सांगू शकत नाही. एक महिला आयुक्त असून कारवाई केली नाही, याची खंत आहे. पुढील दोन दिवसात कारवाई केली नाही तर दोन हजार महिला आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा देखील यावेळेस या महिला कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपीवर याआधी एसीबीची कारवाई?

दुसरीकडे “या महिला कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला असला तरी या आरोपीला अँटी करप्शनने गेल्या काही दिवसापूर्वी सापळा रचून पकडला होता. मात्र यानंतर पालिकेत रुजू झाल्यावर नियमाप्रमाणे सहा महिन्यापर्यंत जनसंपर्कात राहू नये, अशी तरतूद आहे. मात्र त्याला देखील सिटी इंजिनयरसह इतर अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत या अधिकाऱ्याला पाणी खात्यात पद नियुक्त केलं”, असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले आणि छाया वाघमारे यांनी केला आहे. तर अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणीबद्दल संबंधित सचिव किशोर शेळके यांनी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.