कल्याण: कल्याणमध्ये कोंबड्या विकत घेण्याच्या मुद्द्यावरून एका दुकानदाराला तरुणांच्या टोळक्यांनी जबरी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंबड्या फक्त भाईच्याच दुकानातून घ्यायच्या असं सांगत काही टोळक्यांनी दुकानात घुसून कोंबडी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. हल्ल्यात कोंबडी विक्रेता जखमी झाला आहे. मात्र, या घटनेने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
एखादा व्यवसायात तेजी असते. त्यात एका प्रकारची आर्थिक स्पर्धा वाढताना दिसत आहे. त्या स्पर्धेचे रुपांतर गँगवारमध्ये होताना दिसत आहे. आता एक नवीन प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये एका कोंबडी विक्रेत्यास मारहाण करण्यात आली आहे. अब्दुल अलीम शेख असं या दुकानदाराचं नाव आहे. तो कल्याण पूर्वेकडील पत्रीपूल परिसरात चिकनचे दुकान चालवतो. पहाटे 5 वाजताच्या सुमारास तो त्याच्या दुकानात होता. तेव्हा कोंबड्या पुरविणारी गाडी आली होती. कोंबड्या उतरविण्याचे काम सुरु असताना एका रिक्षातून चार ते पाच तरुण आले. त्यांनी आधी कोंबडीच्या गाडी चालकाला पिटाळून लावले. नंतर अब्दुलला मारहाण सुरु केली.
ही मारहाण सुरू असताना अब्दुलने त्यांना जाब विचारला. मला का मारत आहात? असा सवाल अब्दुलने केला. त्यावर, तुला कोंबडीचा धंदा करायचा असेल तर कोंबड्या फक्त भाईच्या दुकानातच घ्याव्या लागतील, असा दमच या तरुणांनी अब्दुलला भरला. हे सर्व तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे अब्दुल प्रचंड घाबरून गेला आहे.
कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात असलेल्या एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने कोंबडीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याने अनेक दुकानदारांवर अशा प्रकारची दहशत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मला मारहाण करण्यात आली. मी माझा व्यवसाय चालवितो. कुणाकडून कोंबड्या घ्यायच्या आणि कुणाकडून नाही ही माझी मर्जी आहे, असं तो म्हणाला. या प्रकरणी अब्दुलने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून इतरांचा शोध घेत आहेत.
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंhttps://t.co/3Cnh1PGisy#MaharashtraAssembly | #mahavikasaghadi | #sangramthopte | #prithvirajchavan | #ashokchavan | #nitinraut | #Congress
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2021
संबंधित बातम्या:
ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा
भांडूपच्या अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा, वरळीत कसली रोषणाई करताय?; शेलार संतापले