महाराष्ट्रातील या शहराला पुराचा धोका जास्त, अभ्यासात धक्कादायक खुलासा

| Updated on: Jun 20, 2023 | 3:15 PM

ठाण्यात पाऊस पडला तर पाणी बाहेर जाण्यासाठी प्रमुख १७ नाले आहेत. यापैकी ८ समुद्राच्या खालच्या भागात आहेत.

महाराष्ट्रातील या शहराला पुराचा धोका जास्त, अभ्यासात धक्कादायक खुलासा
Follow us on

प्रतिनिधी, ठाणे : भारतात शहरीकरण जोरात होत आहे. शहरीकरण नव्या समस्यांना सामोरे जात आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरात वाढत्या शहरीकरणाने पुराच्या घटनांत वाढ होणार आहे. देशात मोठ्या शहरांत पुराच्या घटना पाहायला मिळतात. ठाण्यातील वाढत्या शहरीकरणाचा अभ्यास मुंबईतील वीरमाता जीजाबाई प्राद्योगिकी संस्थानच्या वतीने करण्यात आला. ठाण्यातील पूर्व पूर प्रभावित भागात सिडको ब्रीज, वृंदावन सोसायटी, राबोडी, कोळीवाडा, क्रांतीनगर, मजीवाडा आणि चेंदनी कोळीवाडा या भागांचा समावेश होतो.

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रात २७.५ टक्के वाढ

जर्नल ऑफ इंटेग्रेटेड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटच्या प्रकाशनातून दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात १९९५ ते २००० मध्ये बांधकाम क्षेत्रात २७.५ टक्के वाढ झाली. यामुळे मोकळा भाग, जंगल, पाण्याचे स्त्रोत आणि मॅग्रोव्हमध्ये क्षेत्र कमी झाले. मोकळ्या जागेत २९.५ टक्के जंगलात ८ टक्के, पाण्याच्या स्त्रोतात १८.९ टक्के आणि मॅग्रोव्ह ३६.३ टक्के कमी झाली.

YouTube video player

हे सुद्धा वाचा

२०५० पर्यंत बांधकाम क्षेत्र ५६ टक्के वाढणार

२०५० पर्यंत ठाण्यात बांधकाम क्षेत्रात ५६ टक्के वाढ होईल. त्यामुळे मोकळ्या भागात २९.५ टक्के, जंगलात ५५.९८ टक्के, पाण्याच्या स्त्रोतांत ८७.४ टक्के आणि मँग्रोव्ह ७२.१३ टक्के कमी होईल, असा अंदाज आहे. असे झाल्यास पाण्याची सिंचन क्षमता कमी होईल. शहरात पुराची समस्या आणखी वाढेल.

हवामानातील बदल, पावसाच्या घटना वाढत आहेत. जमिनीत पाणी न मुरल्याने समुद्रात वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. २०५० पर्यंत यात ३१.८ टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यानंतर ही समस्या आणखी मोठे रूप धारण करेल.

पुराचा धोका का वाढला?

ठाण्यात पाऊस पडला तर पाणी बाहेर जाण्यासाठी प्रमुख १७ नाले आहेत. यापैकी ८ समुद्राच्या खालच्या भागात आहेत. परंतु, ६ समुद्राच्या उंच भागातील आहेत. तीन नाले हे समुद्राच्या पाणीपातळीवरील आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पडल्यास ते पाणी रस्त्यावर साचते.

ठाण्यात ९ ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे आपत्ती व्यवस्तापन विभागाच्या लक्षात आले आहे. नगर रचना होताना ४.५ मीटर उंचीवर होणे गरजेचे आहे. शिवाय पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव, पम्पिंग सिस्टीमचा वापर करावा लागेल.