Bread Rates | शहरी असो वा ग्रामीण भाग, सकाळच्या नाष्टयाला (Breakfast) पाव हा लागतोच. त्यात वडा पाव, वडा समोसा, भजी पाव, अंडा भुर्जी, मिसळ पाव अशा रुचकर पदार्थांना पावाशिवाय काही सर येत नाही. इतकंच काय कल्याणचा मलई पावही (Malai Pav) खूपच प्रसिढ आहे . नुसत नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण आता खाद्यप्रेमींना (Food Lovers) पावाचा मोह थोडा आवरावा लागणार आहे. कारण बेकरी चालकांनी पावाचे दर वाढवण्याचा (Bread Rates Hike) निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमचं पावपुराण ही महागणार आहे. आता पावाचेचं भाव वाढल्याने या नाष्ट्याची किमतीही वाढणार आहे. पण आता पावाचेच भाव वाढले असल्याने सामान्याच्या खिशाला आणखी भुर्दंड पडणार आहे. का वाढले पावाचे भाव? आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी याचा आढावा घेतला आहे.
कल्याण डोबिंवलीतील बेकरी चालकांनी पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पावाच्या एका लादीमागे 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बेकरी चालकांनी घेतला आहे. मैदा,तेल व बेकरी उत्पादन तयार करणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्याने नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण, डोंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, आंबिवली, टिटवाळा परिसरातील 40 ते 45 बेकरी चालक आणि मालकानी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे.
मैदा, तेल व बेकरी उत्पादन तयार करणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. परिणामी बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे, बेकरी व्यवसायावर मोठे संकट आल्याने पावाच्या लादीमागे पाच ते सात रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बेकरी चालकाने घेतला आहे. भाव वाढी साठी कल्याण, डोंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, आंबिवली, टिटवाळा परिसरातील 40 ते 45 बेकरी चालक आणि मालकांनी भाव वाढीची चर्चा केली. या चर्चेत महिन्यापूर्वी मिळणारी मैदा गोणी आता 1600 ते 1700 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर, तेल, लाकडी इंधन, वीज पुरवठा याचेही भाव वाढले आहेत. या पावाच्या किमतीमध्ये 4 ते 5 रुपये दरवाढ करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. आता नवीन दर प्रमाणे 4 रुपये एका लादी पावा मागे वाढ करण्यात आलीये. आता हे नवीन दर लागलीच अंमलात येणार आहे. त्यामुळे रविवारी मस्तपैकी आवडीच्या समोसा पाव, वडापाव, मलई पाव, मिसळ पाववर मनसोक्त तावा हाणताना खिश्याचा ही थोडा विचार करा. नवीन दर कदाचित उद्यापासूनच लागू होतील.