उल्हासनगर : उल्हासनगर शहरात असलेल्या 222 शाळांपैकी फक्त 13 शैक्षणिक संस्थांकडेच फायर एनओसी असल्याची धक्कादायक बाब मनविसेनं माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. त्यामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांवर आगीचं संकट घोंघावत असल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगर शहराची विभागणी 5 कॅम्पसमध्ये झालेली असून शहरातील या 5 कॅम्पमध्ये मिळून एकूण 222 शाळा-महाविद्यालये आहेत. यापैकी फक्त 13 शाळा आणि महाविद्यालयांनी अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी मिळवली आहे. तर उर्वरित 209 शैक्षणिक संस्थांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (In Ulhasnagar, out of 222, only 13 educational institutions have Fire NOC)
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती मागवली होती. त्याला अग्निशमन विभागाने दिलेल्या उत्तरात ही चिंताजनक बाब उघड झाली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे या 209 शाळा-महाविद्यालयांपैकी काही शाळा आणि महाविद्यालयं ही एखाद्या इमारतीच्या गच्चीवर किंवा बेसमेंटमध्ये आहेत. या शाळा महाविद्यालयांच्या इमारतीत इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. शिवाय शाळा आणि महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. या रस्त्यामध्ये उघड्या पडलेल्या वायर्स आणि अरुंद जागा आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी फायर एक्झिट नसल्याने आग लागली, तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होतेय. त्यामुळे या शाळा, तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येत्या 15 दिवसात फायर एनओसी मिळवावी, अन्यथा सुरक्षित जागेत स्थलांतर करावं, अशी मागणी मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी केली आहे.
याकडे शैक्षणिक संस्थाचालकांनी दुर्लक्ष केल्यास हायकोर्टात या शैक्षणिक संस्था आणि महापालिका अधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा मनोज शेलार यांनी दिला आहे. दरवेळी एखादी आगीची मोठी घटना घडल्यानंतर अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतो. मात्र कालांतरानं त्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आता उल्हासनगर शहरातील शैक्षणिक संस्थाचालक ही बाब गांभीर्यानं घेतात का? हे पाहावं लागणार आहे.
राज्यात सरसकट शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी काल सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठक घेतली. यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ग्रीन सिग्नल दिला आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आता सरसकट शाळा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं कळतंय.
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारन टप्प्याटप्यानं शाळा सुरु केल्या आहेत. कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न केलं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सची चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. (In Ulhasnagar, out of 222, only 13 educational institutions have Fire NOC)
Shiva Temple | जाणून घ्या त्या खास मंदिराबाबत जिथे शंकरजीच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जातेhttps://t.co/IF6Ence9ty#ShivaTemple #AchaleshwarTemple #Mahadev #LordShiva
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
इतर बातम्या
देशातील पहिलं सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करणार, उदय सामंतांची पुण्यात माहिती
Paytm IPO: कंपनी IPO चा आकार 1,000 कोटी रुपयांनी वाढवणार, नोव्हेंबरमध्ये होणार लिस्टिंग