ठाणे : औरंगजेब आणि मुघल शासक होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटही केलं. त्या ट्वीटला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ट्वीटनं उत्तर दिलंय. भाजपनं आंदोलन केलं. या आंदोलनाला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. तेव्हा भाजपचे नेते मूग गिळून गप्प का होते, असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारला.
एरव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणी शिवाजी म्हटलं तरी यांना पोटशूळ उठतो. त्यावरून रणकंदन माजवतात. हे आणि स्वतः काय म्हणतायत…शिव?? आजोबा आहेत का हे महाराजांचे. असे बाळासाहेबांची शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला.
तसेच जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास आहेत. ही वेडेपणाची लक्षण असल्याची टीका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलीय. वाईट वृत्तीचे भलामण करणारी त्यांचा उदोउदो करणारी ही वक्तव्ये आहेत.
एरव्ही छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी शिवाजी म्हटलं तरी यांना पोटशूळ उठतो आणि त्यावरून रणकंदन माजवतात हे…आणि स्वतः काय म्हणतायत…शिव??
आजोबा आहेत का हे महाराजांचे….? @jaymaharashtra_ @LokshahiMarathi @abpmajhatv
@news18lokamat #लोकासांगेब्राह्मज्ञान #छत्रपतीशिवाजीमहाराज pic.twitter.com/4kQXzyEmlp— Naresh Mhaske (@nareshmhaske) February 6, 2023
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते असोत की स्वतः उद्धव ठाकरे असोत. कोणीही याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. अजित पवार यांनीही पक्षाचा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे गटाने याबद्दल काही न बोलणे याच वाईट वाटत असल्याचा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जितेंद्र आव्हाड वेगवेगळी विधान करतात. विरोधक वृत्तींशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, अर्जून यांच्या शौर्याची तुलना ते विरोधकांशी करतात. ते असते तर त्यांचा इतिहास काय, अशा पद्धतीची वक्तव्य करतात, असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचारसणीचा पक्ष बनविला. तळागळापर्यंत हिंदुत्वाची भूमिका पोहचविली. ठाकरे गटातील प्रमुख नेते पक्षप्रमुख असतील त्यांचा या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला पाठिंबा आहे का, असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला.