अतिरिक्त वजाानमुळे विनेश फोगाटला ऑलिम्पिक फायनलच्या बाहेर केलं गेलं. त्यामुळे सुवर्णपदकाचं विनेशचं आणि करोडो भारतीयांचं स्वप्नभंग झालं आहे. केवळ 100 ग्रॅम अतिरिक्त वजन असल्याने विनेशला ऑलिम्पिकमधून बाहेर पडावं लागलं. या सगळ्यानंतर भारतभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाटबाबत जे झालं त्याचं वाईट वाटतं. मला तिच्या विषयी अतिशय वाईट वाटतंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. विनेश फोगाट ही षडयंत्राची बळी ठरली आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
विनेश फोगाटला खाली खेचण्यासाठी हे सगळं षडयंत्र होतं. सकाळी उठल्यानंतर जर तीच वजन केलं असतं तर तिचं वजन हे दिसलंच नसतं. त्यामुळे हा चावटपणा केलाय. तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तिचं वजन वाढलं. थोडा वेळ दिला असता तर अर्धा तासात वजन कमी झालं असत धावली असती तरी वजन कमी झालं असतं, असं आव्हाड म्हणाले.
विनेश फोगाट ही षडयंत्राची बळी ठरली आहे. कारण तिनेच ब्रिजभूषण सिंह विरुद्ध भूमिका घेतली होती आणि माघार ही घेतली नव्हती. काही आपल्या तत्वांसाठी किंमत मोजावी लागते. हे फोगाटवरून दिसत आहे. पण देशाला कुस्तीतलं पहिलं सुवर्ण पदक एका महिलेने आणून दिलं असतं. पण जे काही झालं ते बघून वाईट वाटतंय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
मी कधीच कोणासोबत जाणार नाही. तेव्हाही गेलो नसतो आजही गेलो नाही आणि उद्या ही जाणार नाही. माझे वैयक्तिक विचार आहेत. मी काही मेंढपाळाच्या मागणं चालणारा मेंढा नाही. मी मेंढ्यांपेक्षा वेगळा जातीचा आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसोबत जाणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे… दादांचा रेकॉर्ड आहे. ऑलम्पिक रेकॉर्ड आहे का? की वर्ल्ड रकॉर्ड आहे की ऑलपिक रेकॉर्ड आहे ते बघू… मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच चालू आहे… जाऊ दे रस्सीखेच चालू दे नाहीतर आणखीन काही होऊदे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.