पालघर: जितेंद्र अव्हाड यांनी आज टिव्टर द्वारे आरोप केलेल्या पोलीस अधिका-याविषयी आपला संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षात असताना शेखर बागडे या पोलीस अधिका-याची वागणूक अत्यंत उध्दटपणाची होती. कुणाही लोकप्रतिनीधीची कॉलर पकडून त्याचा तो अपमान करतो. आर्थिक गुन्हे शाखेला बदली झाल्यावर ही बिल्डरांकडून कार्यालयात बोलवून, हप्ते घेतल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय. साडेतीन लाख लोकांमधून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीविषयी त्याच्या मनात आदर नसेल तर तो व्यवस्थेचा भाग होऊ शकत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
शेखर बागडे या अधिकाऱ्याची बेनामी संपती असल्याचही आरोप आंव्हाड यांनी केलायं. आता परत ठाण्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी बागडे प्रयत्न करत असल्याचा ही आरोप केलायं. लोकशाही मध्ये लोकप्रतिनीधी बद्दल जर आदर नसेल तर असा अधिकारी व्यवस्थेचा भाग होवू शकत नाही. त्याला बाजूला बसवण्याची मागणी महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षकांना केल्याच आव्हाड यांनी म्हटलं आहे. बा
गडे माझ्याशी उध्दट बोलला. आणि माझ्याशी उध्दट बोलण्याचं संभाषण रेकॉर्ड केल्याचा ही आरोप आव्हाड यांनी केला आहे. ते रेकॉर्डिंग सोबत असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांना ऐकवलं असल्याचा दावा त्यानी केलाय.
The most arrogant police officer #shekhar_bagade who beat up a corporater on road abused many public representatives satisfying his own ego and now wants a plum posting his corruption must b interrogated his hotels on express way and many more @DGPMaharashtra @ThaneCityPolice pic.twitter.com/fxpVHqvYma
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 21, 2021
केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद मध्ये वसई विरार मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करताना वसईच्या माणिकपूर पोलिसांनी 10 तास कार्यकर्त्यांना बसवून ठेवले होते यावर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्यावर देखील 30 ते 35 आंदोलनाच्या माझ्यावर देखील केसेस आहेत. आंदोलन करताना पोलीस ताब्यात घेतात आणि अर्ध्या तासात सोडून देतात. इथं कार्यकर्त्यांना 10 तास बसवून ठेवलं गेलं. हा कोन नवीन अधिकारी आला आहे, असा सवास जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शेतकरी, संस्थांकडून पाणी वापरासाठी मागवले अर्ज; नाशिक पाटबंधारे विभागाकडे साधा संपर्क
Jitendra Awhad said arrogant officers like Shekar Bagade will not be part of system in democracy