कल्याणमधील धक्कादायक घटना, कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

| Updated on: Dec 13, 2024 | 7:50 PM

कल्याणमध्ये भटक्या कुत्रा आणि मांजरीने चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरात 18,700 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावले आहे. मृत तरुणाने सुरुवातीला उपचार केले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पालिकेने याबाबत चौकशीचे आश्वासन दिले आहे.

कल्याणमधील धक्कादायक घटना, कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू
कल्याणमध्ये कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Follow us on

कल्याणमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात 18,700 जणांना कुत्रा चावला आहे. त्यामुळे कल्याण डोबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण पश्चिमेतील शुभम चौधरी या तरुणाचा भटक्या कुत्रा आणि मांजर चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ समजून उपचार न करणाऱ्या शुभमला नंतर त्रास होऊ लागला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात कल्याण डोबिवली परिसरात 18,700 जणांना कुत्रा चावल्याची घटना पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून कल्याण डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

कल्याणच्या गोल्डन पार्क इमारतीत राहणारा शुभम नोकरीच्या शोधात होता. दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्यावर त्याने उपचार घेतले नाहीत. मागील आठवड्यात मांजर चावल्यावरही त्याने दुर्लक्ष केले. या दरम्यान त्याची १० डिसेंबरला प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला कल्याणमधील खाजगी रुग्णालय, कळवा आणि शेवटी कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच १२ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.

याबाबत शुभमच्या वडिलांनी खंत व्यक्त करत माझ्या मुलाच्या कृतीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. तर याबाबत कल्याण महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात 18700 जणांना कुत्रा चावला असल्याची माहिती दिली. तसेच एका संस्थेमार्फत कल्याण डोंबिवली परिसरातील भटक्या कुत्र्यांचे 900 रुपये देऊन त्यांचे वॅक्सिंग होत असून जी घटना घडली आहे त्या संदर्भात चौकशी करणार असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

दुर्लक्ष करु नका, तातडीने उपचार घ्या

भटका कुत्रा किंवा मांजरीने चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरु शकतं. कल्याणमध्ये घडलेली घटना याचं ताजं उदाहरण आहे. त्यामुळे कुत्र्याने चावल्यास तातडीने उपचार घ्यायला हवेत. योग्यप्रकारे औषधोपचार केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. आपण अतिशय सुखरुप राहू शकतो. कुत्रा चावल्याने रेबिससारख्या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण नियमितपणे स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कुत्रा चावल्याची घटना घडल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.