ठाणे : पुराच्या पाण्यामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे गेले आहेत. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पुलावरील सर्व वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवली आहे. तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी सुरु करायचा की नाही, याबबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. (Kalyan Gandhari bridge broken due flood bridge is been closed as precautionary measure)
मागील काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानीबरोबरच रस्ते, पूल उखळून पडले आहेत. याच पाऊस आणि पुरामुळे कल्याण-गांधारी पुलाची नासधूस झाली आहे. पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या या पुलाचा वापर भिवंडी, पडघ्याच्या दिशेने जाण्यासाठी होतो.
कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या भागात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चाकरमान्यांना त्यांच्या घरी जाण्यास उशीर होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेता सुरक्षिततेसाठी पुलावरील वाहतूक बंद करत या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पीडब्ल्यूडीकडून या पुलाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर या पुलाबाबत निर्णय होणार आहे.
इतर बातम्या :
जनतेचा आक्रोश समजून घ्या, अंगावर धावून जाणं योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना फटकारलं
अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी
(Kalyan Gandhari bridge broken due flood bridge is been closed as precautionary measure)
नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत ‘हा’ अधिकारी ठेवण्याचा निर्णयhttps://t.co/ZoH5xA0J8s#NarayanRane | #NCP | #AjitPawar | @NCP | @AjitPawarSpeaks | @MeNarayanRane
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2021