सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कल्याण | 28 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज कल्याण दौऱ्यावर आहेत. कल्याण पश्चिममधील के एम अग्रवाल कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणूक आणि राजकीय मुद्द्यांवर सुषमा अंधारे बोलत्या झाल्या. या लोकसभा निवडणुकी सुषमा अंधारे देखील मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यावर सुषमा अंधारेंनी स्पष्ट भाष्य केलं. तसंच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंनाही सुषमा अंधारेंनी टोला लगावला.
माझं नाव चर्चेत आहे. मात्र मला अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचं आहे. मुक्त संवादच्या माध्यमातून माझी ती वाट आहे आणि त्यासाठी मी निघाली आहे. पण पक्षाने सांगितलं, तर वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात मी लढले, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. खासदार श्रीकांत शिंदे हा फारच मोठा अडचणीचा डोंगर आहे, असं का वाटतं? लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो अडचणीचाच डोंगर आहे. त्याच्या सामोरं जाताना आम्हाला तो अडचण वाटत नाही, असं म्हणत कल्याणमध्ये बोलताना सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदेंना टोला लगावला.
मातृत्व ते शिवतीर्थ मुक्त संवादाचा आजचा 23 वा दिवस आहे. अकरावी लोकसभा कल्याणमध्ये ही यात्रा पोहोचली आहे. तीस दिवसापासून लोकांचे वेगवेगळे प्रश्न समजून घेत आज कल्याणमध्ये पोहोचलो आहोत. मातोश्रीवर याचा समारोप होणार आहे. आज कल्याण मध्ये सभा उद्या ठाण्यात आणि पुढे धारावीमध्ये मोठी सभा होणार आहे, असं सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं.
अति गर्भसमिट मुख्यमंत्री शिंदेना आपल्या पोरांना दोन वेळा खासदार करावसं वाटतं. मग काय हरकत आहे? त्यांच्या बाप दादांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलं. महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता राहण्यासाठी त्यांच्या पिढ्या येथे घालवल्या त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करणं? हे ठाकरे साहेबांची नाही ही सर्व शिवसैनिकांची मागणी आहे, असं म्हणत अमित शाह यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.