Corona : आरोग्य कर्मचारीचं कोरोनाच्या विळख्यात, उल्हासनगर अंबरनाथमधील फ्रंटलाईन वर्कर्सना कोविड

| Updated on: Jan 09, 2022 | 6:46 AM

कोरोनाच्या तिसर्‍या (Corona Third Wave) लाटेत उल्हासनगर (Ulhasnagar), अंबरनाथ (Ambarnath)आणि बदलापूर (Badlapur) मधील अनेक आरोग्य कर्मचारी (Health Workers Corona Infected) कोरोना बाधित झाले आहेत.

Corona : आरोग्य कर्मचारीचं कोरोनाच्या विळख्यात, उल्हासनगर अंबरनाथमधील फ्रंटलाईन वर्कर्सना कोविड
Thane Ulhasnagar Corona Update
Follow us on

ठाणे: अतिशय वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या तिसर्‍या (Corona Third Wave) लाटेत उल्हासनगर (Ulhasnagar), अंबरनाथ (Ambernath)आणि बदलापूर (Badlapur) मधील अनेक आरोग्य कर्मचारी (Health Workers Corona Infected) कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचं वातावरण पाहायला मिळतंय. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात 8 आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून अंबरनाथच्या छाया रुग्णालयात १ डॉक्टर आणि दोन नर्सेसना कोरोना झालाय. बदलापूर पालिकेच्या रुग्णालयातील 4 कर्मचारी कोरोना बाधित झालेत तर बदलापूर ग्रामीण रुग्णालयातही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं दिसून येत असल्यानं चिंतेच वातावरण निर्माण झालंय.

डॉक्टर नर्सेस कोरोनाच्या विळख्यात

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात गेल्या आठवडाभरात एका डॉक्टरसह 5 नर्स आणि 2 टेक्निशियन यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, अंबरनाथमध्ये असलेल्या छाया उपजिल्हा रुग्णालयात 1 डॉक्टर आणि 2 नर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात सुद्धा 4 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बदलापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयाच्या अधीक्षकांसह अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं अनेकांनी टेस्ट केल्या आहेत.

75 टक्के कर्मचाऱ्यांना सर्दी ताप खोकला ही लक्षण

मध्यवर्ती आणि छाया रूग्णालयात जवळपास 75 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं जाणवत असल्याची माहिती या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी आरोग्य यंत्रणेलाच कोरोनानं विळखा घातल्याचं पाहायला मिळतंय. सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाची लक्षणं असलेले अनेक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. ओपीडीमध्ये या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारीही या रुग्णाच्या संपर्कात येत असून त्यामुळे कोरोनाचा फैलाव आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचं वातावरण पाहायला मिळतंय.

राज्यात शनिवारी देखील 41 हजार कोरोना रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात शनिवारी नव्या 41 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.05 इतका आहे. दरम्यान, 41 हजार 434 नव्या रुग्णांपैकी 20 हजारपेक्षाही जास्त नवे रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान ओमिक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत

इतर बातम्या:

Maharashtra News Live Update : उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट, महाराष्ट्रातही पुढच्या 2 दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : शिवसेना नेते सचिन अहिर यांना कोरोना संसर्ग

Maharashtra corona cases frontline Health Workers Doctors Nurses tested positive in ambernath badlapur ulhasnagar