ठाणे : मनसेची उत्तर सभा ठाण्यात होत आहे. या सभेत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)वर तोफ डागली आहे. यावेळी आपल्या भाषणात देशपांडेंनी शिवसेनेसह राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इशरत जहॉला पाठिंबा देणारे तुम्ही. अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून पाठिंबा देणार तुम्ही. तुम्ही आम्हाला सांगणार. आम्ही सगळे प्रभू श्रीरामचंद्राचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावण्याचा प्रयत्न करु नका. तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. आमचं आव्हान आहे. समोरासमोर या, मग बघू; असा इशारा संदीप देशपांडेंनी ‘मुंब्य्राची म्हैस‘ असा उल्लेख करत अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. (MNS leader Sandeep Deshpande targeted NCP leader Jitendra Awhad at the MNS sabha in Thane)
शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधीपासून डिवचायला लागली. मी हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी केलं, वेगळं काहीतरी केलं तर मी समजू शकतो. पण हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र लावलं की तुम्ही डिवचले जात असाल म्हणजे तुमचा भगवा रंग शंका घेण्यासारखा आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघालेले आहात. माझ्या घरासमोर लावा हनुमान चालीसा. येत्या महानगरपालिकेत शिवसेना संपलेली दिसेल, असे देशपांडे पुढे म्हणाले. (MNS leader Sandeep Deshpande targeted NCP leader Jitendra Awhad at the MNS sabha in Thane)
इतर बातम्या