कल्याण : डोंबिवली एमआयडीसीमध्ये केडीएमसीकडून विभा कंपनीच्या जागेत 530 बेडसचे कोव्हिड सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. येत्या काही दिवसात हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. आज या रुग्णालयाची आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला लक्ष्य केलं. आमदार पाटील यांनी बोलताना कोरोना हा आजार होता, आता बाजार झाला, अशी टीकाही केली आहे. तसेच नवीन होणारे कोरोना सेंटर हे नक्कीच जनतेच्या फायद्याचं असेल.
प्रशासनाला गरज असेल तिथे आम्ही सकारात्मक राहू मात्र जुन्या कोव्हिड सेंटर्सचे ऑडिट होणं देखील होणे गरजेचे आहे. मागच्या वेळेस जसे घोळ झाले तसे आता व्हायला नको याबाबत आमचं लक्ष असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटाही काढला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर श्रेयवादाबाबत टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना राजू पाटील यांनी पाणीप्रश्नी मी पाठपुरावा केला त्याचे माझ्याकडे पत्र आहेत. मी कुठे बोललो तुम्ही पाठपुरावा केला नाही. ठाण्याचे मालक सांगतील तितकेच हे बोलतील. ते किती वेळ सहन करणार. आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत. मालक म्हणून फिरायचं तर बाउन्सर म्हणून फिरतात त्यांनी आमच्यावर टीका करू नये अशी सणसणाटी टीका शिवसेनेच्या माजी स्थायी समिती सभापती व सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यावर केली आहे.
27 गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले होते. त्यावर शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी या कामासाठी खाजदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी आहे अशी टिका केली होती. त्याला आज मनसे आमदार पाटील यांनी प्रतिउत्तर देत विकास कामात टक्केवारी खाण्यात पीएचडी असलेल्यांची माझ्या विरोधात बोलण्याची लायकी आहे का असा सवाल असा पलटवार केला आहे. खासदार शिंदे यांनी पाठपुरावा केला नाही असे मी कुठे बोललोच नाही हा मुद्दा देखील पाटील यांनी नमूद केला. (Mns mla raju patil reaction corona and rulling party)
इतर बातम्या
Nagpur NMC | एकला चलो रे! काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतल्या बैठका; स्वबळावर निवडणूक लढणार?
नाना पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश, वाद पेटणार?