कल्याण : कल्याण ग्रामीणमधील 27 गावे आणि डोंबिवली शहरावर आयुक्तांचे अजिबात लक्ष नाही. फक्त कल्याणचे आयुक्त म्हणून काम करीत आहेत. रस्त्यावरील खड्डे अजून बुजविले गेले नाही. धुळीमुळे लोकांवर मास्क वापरण्याची वेळ आली आहे. आयुक्तांना याचा जाब विचारणार अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. एका रस्त्याच्या भूमीपूजनाच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. (MNS MLA Raju Patil’s reaction to KDMC Commissioner)
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर खड्डे भरण्याचे काम सुरु झाले. मात्र ज्या प्रकारे हे खड्डे भरले पाहिजेत त्या प्रकारे भरले जात नाही. काही ठिकाणी तर परिस्थीती अशी आहे. दररोज अपघात होत आहेत. रस्त्याच्या कामाबाबतच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. ही घटना ताजी असतानाच खड्डे बुजविण्याच्या कामावरुन मनसे आमदर राजू पाटीलही संतापले आहे. केडीएमसी आयुक्त 27 गावांकडे अजिबात लक्ष देत नाही. डोंबिवलीकडेही त्यांचे लक्ष नाही. ते फक्त कल्याणचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्याची सध्या दिल्ली वारी सुरु आहे. या आठवड्यात आपण आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील म्हणाले. कल्याण काटई येथील मोठ्या रस्त्याच्या कामाच्या भूमीपूजनादरम्यान त्यांनी हे विधान केले.
महापालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नसल्यानं नागरिकांवर चक्क छत्र्या घेऊन शौचाला बसण्याची वेळ आलीये. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उल्हासनगर शहरातील कॅम्प-2 परिसरात हनुमान नगर हा झोपडपट्टी परिसर आहे. या परिसरात महापालिकेने काही वर्षांपूर्वीच लेखी रुपये खर्चून महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारलं. मात्र, या शौचालयाचे दरवाजे काही दिवसातच तुटले, तर काही चोरीला गेले. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकांपासून ते महापालिकेपर्यंत सगळीकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना आता दरवाजांअभावी चक्क छत्री घेऊन शौचाला बसावं लागतंय. दररोज सकाळी इथले नागरिक एका हातात पाण्याचा डबा, तर दुसऱ्या हातात छत्री घेऊन शौचाला जातात. धक्कादायक बाब म्हणजे पुरुष आणि महिला अशा दोन्ही शौचालयांची हीच अवस्था आहे. (MNS MLA Raju Patil’s reaction to KDMC Commissioner)
Maharashtra college Reopen | कृषी विद्यापीठ, संलग्न महाविद्यालये 20ऑक्टोबरपासून सुरु, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश https://t.co/78EHlIIpXN#collage | #school | #agriculture | #school | #CoronavirusUpdates | #corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2021
इतर बातम्या
दाराला कडी लावण्याच्या वादातून शेजाऱ्यावर चाकूहल्ला, आरोपीला अटक आणि जामीन
मुस्लीम आणि दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट