ठाणे : दिवाळीच्या निमीत्तानं घरा-घरात साफसफाई करून किराणा माल भरून दिवाळी फराळ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवा परिसरात रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे झालेल्या कारवाईनंतर प्रकल्पग्रस्त कुटुंबियांवर मात्र संक्रांत आली आहे. गेली 17-18 वर्षे ज्या घरात काढली, पै पै जमा करून संसार उभा केला, तो संसार एका दिवसात पालिकेनं केलेल्या कारवाईमुळे रस्त्यावर आलाय. याच प्रकल्पग्रस्तांना चार भिंतीचा आडोसा आणि डोक्यावर छप्पर मिळाले खरे; मात्र त्या भिंतीत तो आपलेपणा अजून आलेला नसल्याची खंत दिवावासीयांची आहे. (Municipal Corporation take action on 6 buildings in the diva railway station area)
ऐन दिवाळी दरम्यान महापालिकेने कारवाई केल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली. होत नव्हतं ते धुळीस मिळालं, महापालिका प्रशासनाने नागरिकांची गरज लक्षात घेता प्रकल्पग्रस्तांना पर्यायी म्हणून बीएसयूपी प्रकल्पात राहण्यास घर दिली मात्र तिथे देखील या नागरिकांच्या पदरात चिंताच पडली आहे. त्याला कारण देखील असंच आहे. एकीकडे दिवाळी निमित्त घरांची सजावट केली जातेय. घराघरांत फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. ठाणे महापालिका हद्दीतील पडले गावात उभ्या असलेल्या बीएसयूपी प्रकल्पात प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिलेल्या इमारतीत मात्र ही लगबग अद्याप दिसत नाहीये. कारवाई दरम्यान जेवढं वाचवता येईल ते सामान या छोट्या घरात कशी ठेवायची त्यात या इमारतींमध्ये असलेल्या असुविधांना कसं तोंड द्यायचं? दिवाळी साजरी करायची तरी कशी? असा मोठा प्रश्न या प्रकल्पबाधितांना पडलाय. त्यामुळे यंदाची दिवाळी हि आमच्यासाठी काळी दिवाळी असल्याची भावना हे नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
अनधिकृत बांधकामांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवा शहरात ठाणे महानगर पालिकेच्या वतीने दिवा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे . यासाठी ठाणे महानगर पालिकेने उच्च न्यालायाच्या आदेशाने रस्ता रुंदीकरणात अडथळे निर्माण करणाऱ्या दिवा रेल्वे स्थानक परिसरातील 6 इमारतींवर धडक कारवाई करत बुधवारी तोडक कारवाई केली. या इमारतींमध्ये 123 कुटुंब वास्तव्यास होते. कारवाई करण्याअगोदर प्रकल्पग्रस्त नागरिकांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र दिवाळीपर्यंत आम्हाला वेळ द्या अशी मागणी येथील नागरिक करत होते. नागरिकांच्या मागणीला ठाणे महापालिका प्रशासनाने विचारात न घेता बुधवारी थेट कारवाईचा बडगा उगारल्याने येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
घरात असलेला संसार बाहेर काढण्याची वेळ न मिळाल्याने नागरिकांचा राग उफाळून आला. तर गेली 15 ते 16 वर्षांपासून राहत असलेलं स्वप्नातलं घर आणि पै न पै जमा करुन संसारासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू डोळ्यासमोर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जमीन दोस्त झाल्या. यावेळी काहींनी कारवाईचा विरोध केला तर काहींना अश्रू अनावर झाले. दिवा शहरात अशा अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात येतात आणि कमी किंमतीत घरे मिळतात म्हणून नागरिक ती घेत असतात. ठाणे महापालिका प्रशासन नेहमीच याकडे दुर्लक्ष करत या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून पाणी बिल तसेच कर सुद्धा वसुल करते आणि अचानक काही वर्षांनी महापालिका प्रशासनाला जाग येते आणि अशा प्रकारे कारवाई केली जाते. त्यामुळे नक्की चूक कोणाची, स्थानिक लोकप्रतिनिधींचं आपल्या भागात काय घडतंय याकडे लक्ष नसत का? आणि याला जवाबदार नक्की कोण हा मोठा प्रश्न आहे. (Municipal Corporation take action on 6 buildings in the diva railway station area)
Realme नंतर आता Oneplus देखील इलेक्ट्रिक कार सादर करणार, कंपनीकडून ट्रेडमार्क दाखल#Realme #OnePlus #ElectricVehicle https://t.co/tAwKPYRxv6
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021
इतर बातम्या
नकली सोन्याचे बिस्किटे विकून नागरिकांना फसविणारा डोंबिवलीतील भामटा गजाआड
दिवाळी धमाका ऑफर, दारुच्या बाटलीवर थंडगार बिस्लेरी मोफत, ठाण्यातील दुकानदाराची शक्कल