कल्याण : केडीएमसी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची प्रभाग स्तरावर तयारी सुरु झाली आहे. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमची भूमिका स्वबळाची आहे. त्याआधारे प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. पुढचा निर्णय पश्रश्रेष्ठी घेतील, असे शिंदे यांनी सांगितले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधीच प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, असा अशा सूचना त्यांनी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांना दिल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वबळाची भाषा केली आहे. त्यासाठी त्यांनी संपूर्ण 122 प्रभागांसाठी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. वार्ड क्रमांक 25 मधील रामदासवाडी येथे आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रभागासाठी उदय जाधव यांची उमेदवारी सुद्धा याठिकाणी निश्चित करण्यात आली. कल्याण डोंबिवलीत विधायक कामे झालेली नाहीत. अजूनही बीएसयूपीतील घरे नागरीकांना दिलेली नाहीत. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. अनेक भागात स्वच्छता, विजेचा आणि पाण्याचा प्रश्न आहे, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली होती. या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे आदेश नाना पाटोले यांनी कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या.
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध नागरी प्रश्नावर महापालिका मुख्यालयात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना काँग्रेस महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी बरोबर आघाडीत असलेली काँग्रेस येथे स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत 122 नगरसेवक असलेल्या महापालिकेत कॉंग्रेसचे फक्त 4 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेत एवढेच नाही तर हा महाविकास आघाडी सरकारमधील 12 मंत्री कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घेणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा :
चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही, कागदाचं विमान उडवणार का ? नितेश राणेंची बोचरी टीका