Thane: मुंब्र्यात पालिकेचे नवे डायलिसिस केंद्र, ‘या’ रुग्णालयात घेता येणार उपचार

| Updated on: Jul 19, 2022 | 1:38 PM

ठाणे, कोपरी, लोकमान्यनगर, कळवा आणि घोडबंदरपाठोपाठ मुंब्रा येथील कौसा रुग्णालयात (Kausa Hospital Mumbra) महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वस्त दरात डायलिसिसची (dialysis centre in Mumbra) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या या सुविधेचा आतापर्यंत 16 रुग्णांनी लाभ घेतला आहे. या नवीन केंद्रामुळे मुंब्रा आणि दिवा वासीयांना परिसरातच डायलेसिसची सुविधा उपलब्ध झाली आहे. ठाणे, […]

Thane: मुंब्र्यात पालिकेचे नवे डायलिसिस केंद्र, या रुग्णालयात घेता येणार उपचार
Follow us on

ठाणे, कोपरी, लोकमान्यनगर, कळवा आणि घोडबंदरपाठोपाठ मुंब्रा येथील कौसा रुग्णालयात (Kausa Hospital Mumbra) महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वस्त दरात डायलिसिसची (dialysis centre in Mumbra) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या या सुविधेचा आतापर्यंत 16 रुग्णांनी लाभ घेतला आहे. या नवीन केंद्रामुळे मुंब्रा आणि दिवा वासीयांना परिसरातच डायलेसिसची सुविधा उपलब्ध झाली आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये (dialysis centre in Thane) पाच ठिकाणी स्वस्त दरात डाय सिसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने काही वषांपूर्वी घेतला होता. यानुसार कोपरी, लोकमान्यनगर, कळवा रुग्णालय, घोडबंदरमधील पालिकेचे आरोग्य केंद्र आणि मुंब्रा रुग्णालयात अशा पाच ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

या ठिकाणी डायलिसिस सुविधेसाठी आवश्यक असणारी एकूण 50 यंत्रे ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार कोपरी, लोकमान्यनगर, कळवा रुग्णालय आणि घोडबंदरमधील पालिकेच्या आरोग्य केंद्रात डायलिसिसची सुविधा काही वषांपुर्वीच सुरू झाली होती. मुंब्रा रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे वेथे ही सुविधा सुरू करण्यात आली नव्हती. रुग्णालयाचे काम पूर्ण होताच या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही केंद्रे खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आली आहेत.

तीन प्रकारची वर्गवारी

ठाणे महापालिकेने डायलेसिसच्या सुविधेसाठी तीन प्रकारची वर्गवारी करून दर ठरवून दिले आहेत. ज्यात ठाणे महापलिका क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना ज्यांचे उत्पन्न  वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न  क्रिमीलेअर मर्यादेपेक्षा कमी असेल अशा रुग्णांना प्रति डायलेसिस 500 रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. तर या मर्यादेएवजी अधिक उद्यन्न असलेल्या नागरिकांना 1 हजार रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे. पालिकेच्या या सुविधेमुळे अनेक गरजूंना लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा