ठाणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांना कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी परब यांना अनिल देशमुख यांच्याप्रमाणे तुरुंगात जावेच लागेल, असं भाजपचे नेते किरीट समोय्या (Kirit Somiaya) यांनी म्हटलं आहे. परब यांनी कोरोना काळात बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला. सचिन वाझेच्या खंडणीच्या पैशातून हा रिसॉर्ट बांधला का? महाराष्ट्र कॉन्स्टिट्यूशन बोर्डाने हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हे रिसॉर्ट पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करयाचा आहे, असं सांगतानाच मी रत्नागिरीला जात आहे. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी रत्नागिरीला निघालो आहेच. शिवाय काही मंत्र्यांच्या घोटाळ्याचे कागदपत्रंही माझ्याकडे येणार आहेत. तेही मी पाहणार आहे. त्यानंतर या कागदपत्रांवर भाष्य करेल, असं सोमय्या यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी अनिल परबांचा रिसॉर्ट तोडलाचं पाहिजे, असं म्हटलंय. त्यासाठी जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परब गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात फायनल ऑर्डर आता आली आहे.ठाकरे सरकार का कारवाई करत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. रिसॉर्ट बांधणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं सोमय्या म्हणाले.
सोमय्या यांनी कालच जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्यावरून ठाकरे सरकारला घेरलं होतं. सुजित पाटकर आणि राजीव साळूंखेंचे काय संबंध आहेत हे संजय राऊतांच्या मुलींना सांगू द्या. संयुक्तपणे जमिनी खरेदी केल्या आहेत. राजीव साळुंखेंचं वार्षिक उत्पन्न 70 हजार आहे आणि त्यांना 100 कोटींचं टेंडर मिळालं. कोव्हिड घोटाळ्यांना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुजित पाटकर जबाबदार आहेत. ही कंपनी केव्हा तयार झाली, उलाढाल किती, स्टाफ किती, खोटे पुरावे सादर करून राज्यात लोकांची हत्या केली, अशी टीकाही त्यांनी केली होती.
भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील : संजय राऊत https://t.co/rV5UKXR1AC
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2022
संबंधित बातम्या:
कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?
पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर