कल्याण : कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा तलाव परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मृत कासव(Tortoise) आढळून येत होते. दोन दिवसांपूर्वी 50 ते 60 कासव तलावाच्या किनार्याला मृतावस्थेत आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली होती. तलाव(Lake) परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता त्यांना तलावाच्या किनार्यावर कासव मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी याबाबत प्राणिमित्र, वन विभाग, प्रदूषण मंडळ व महापालिका अधिकाऱ्यांना देखील माहिती दिली. गौरीपाडा तलाव परिसरात तीन दिवसांपासून प्राणी मित्रांसह वनविभागाचे पथक देखील पाहणी करतेय. या तलावाच्या पाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी नेले आहेत. तर वनविभागातर्फे मृत कासव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर कासवांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे ठाणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक एस रामाराव यांनी सांगितले. (Only after the postmortem report will the cause of death of the turtles in Gauri Pada lake become clear)
दुसरीकडे प्राणी मित्रांकडून देखील या ठिकाणच्या किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. ग्रामस्थांकडून तलावात मासेमारी केली जाते. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात कासव मृत्यूमुखी पडत असल्याने याचं नेमकं काय कारण आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट तात्काळ मागवावा. जेणेकरून याचं कारण स्पष्ट होईल. तात्काळ याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत लवकरात कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या काठावर शनिवारी अनेक कासवं ही मृतावस्थेत आढळून होती. या तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने प्राणी प्रेमिंकडून हळहळ व्यक्त होत आहे. गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. त्याआधीही दोन दिवसापूर्वी काही कासव मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती भाजपाचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी दिली. माहिती मिळताच दया गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित घटनेची माहिती महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास कळवली. (Only after the postmortem report will the cause of death of the turtles in Gauri Pada lake become clear)
इतर बातम्या
कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूनं गाठलं! तिघा भावंडावर काळाचा घाला, खड्डा चुकवण्याचा नाद जीवावर बेतला!