डोंबिवली : भाजप कार्यकर्ता मनोज कटके (Manoj Katke) यांच्यावर हल्ला (Attack) करणाऱ्या खऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे. पोलीस राजकीय दबावात काम करत असतील तर याबाबत विधानसभेत प्रश्न उचलू, वेळ पडली तर मोर्चा काढू आणि मी त्या मोर्चात सहभागी होणार आणि पोलीस ठाण्याला घेराव घालणार असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. राजकारणातलं गुन्हेगारीकरण पाहायला मिळतंय. त्याला शासनाचे संरक्षण पाहायला मिळतंय. महाराष्ट्र अधोगतीकडे जातोय. महाराष्ट्रात पोलिस दल कधी इतक्या राजकीय दबावात काम करत नव्हते. आता जो राजकीय दबाव पाहायला मिळतोय ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे अतिशय घातक आहे असेही फडणवीस म्हणाले. (Opposition leader Devendra Fadnavis warns the ruling party and police)
आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज कटके या भाजप कार्यकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डोंबिवली एम्स रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि गुन्हा उशिराने दाखल करण्याबाबतही टीका केली. यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला शहराध्यक्ष पूजा पाटील, नगरसेवक मंदार हळबे, माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे तसेच माजी नगरसेवक शैलेश धात्रक, राहुल दामले मोरेश्वर भोईर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाकडून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मंत्रीपदातून हटवण्याकरीता 9 तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्च्याच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन मुंबईतील के.सी.कॉलेज हॉलमध्ये करण्यात आले होते. बैठकीत भाजप आमदार, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळर, आमदार यांनीही मार्गदर्शन केले. (Opposition leader Devendra Fadnavis warns the ruling party and police)
इतर बातम्या
निवडणूक आयोगाचे अधिकार कमी होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय