कल्याण : नवजात बाळाला ट्रेनमध्ये सोडून महिलेने पळ काढल्याची घटना टिटवाळा रेल्वे स्थानकात 20 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. सदर महिला डोंबिवलीतील रहिवासी असून रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीच्या आधारे कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
टिटवाळा रेल्वे स्थानकात 20 नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी भादवी 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपीसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते बाळ सापडले, ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसत होती. तिच महिला असावी अशी शक्यता पोलिसांना वाटली. याच शक्येतेच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाडा परिसरात राहणारी आहे.
याबाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अशरद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकराचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Police arrested a woman and her boyfriend who dropped off a newborn baby on a train)
इतर बातम्या
Nagpur Crime | मकरधोकडा शिवारात आढळली मानवी कवटी, हाडे; हे कुणाचे अवयव असणार?
Madhya Pradesh Crime: घरगुती वादातून दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या